मराठी बातम्या /बातम्या /Viral /पोलिसांच्या मुलांनीच तोडला नियम, व्हायरल झाला विनामास्क क्रिकेट खेळतानाचा VIDEO

पोलिसांच्या मुलांनीच तोडला नियम, व्हायरल झाला विनामास्क क्रिकेट खेळतानाचा VIDEO

मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकार आहे. असे न करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहे. मात्र पोलिसांची मुलचं नियम ढाब्यावर बसवत असतील तर? असाच प्रकार गुजरातमधील सुरतमध्ये घडला.

सुरत, 30 सप्टेंबर : देशातील कोरोनाबाधितांनी आता 62 लाखांचा आकडा पार केला आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असातान देशभरात अनलॉकची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान अनलॉक जारी करण्यात आला असला तरी, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकार आहे. असे न करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहे. मात्र पोलिसांची मुलचं नियम ढाब्यावर बसवत असतील तर? असाच प्रकार गुजरातमधील सुरतमध्ये घडला.

गुजरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना पोलीस रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहे. यात काहीवर दंडात्मक तर काहींना पोलीस कोठडीही दाखवण्यात आली. त्यामुळे पोलिसांची ही कडक शिस्त काही लोकांच्या पचणी पडत नसल्याचे दिसत आहे.

त्यामुळे काही मुलांनी पोलिसांच्या मुलांचेच विनामास्क क्रिकेट खेळतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये काही मुलं इमारतीच्या आवारात क्रिकेट खेळताना दिसत आहे.

वाचा-वाईन शॉपमध्ये घुसून कात्रीने केला हल्ला अन् तिथेच उभं राहून प्यायली दारू VIDEO

वाचा-बोटीवर उभं राहून करायला गेला रोमँटिक प्रपोज; अचानक तोंडावर पडली लाथ, पाहा VIDEO

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ही मुलं मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग न पाळता क्रिकेट खेळताना दिसत आहेत. यात केवळ एका मुलानं तोंडाला रुमाल बांधल्याचे दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सुरतचा असल्याचे सांगितले जात आहे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india