Home /News /viral /

एका बदकाची शिकार करण्यासाठी आले 4 वाघ; पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही, VIDEO

एका बदकाची शिकार करण्यासाठी आले 4 वाघ; पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही, VIDEO

चार वाघ मिळून बदकाची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इवल्याशा बदकाने अशी शक्कल लढवली की चारही वाघांनाच हार मानावी लागली (Duck Playing Hide and Seek With Tigers).

  नवी दिल्ली 03 जानेवारी : माणसाप्रमाणेच प्राण्यांना आणि पक्षांनाही मस्ती करायला आवडतं. आजकालच्या जीवनात माणूस इतका व्यग्र झाला आहे की पक्षी आणि प्राण्यांची ही मस्तीही आनंदाने पाहात नाही. सध्या एका बदकाचा मस्ती करतानाचा एक व्हिडिओ समोर (Viral Video of Duck) आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही नक्कीच हसू येईल. पिल्लाला वाचवण्यासाठी सिंहासोबत भिडलं जिराफ; शेवट पाहून पाणावतील डोळे, VIDEO आपल्या सर्वांना माहिती आहे की वाघाची गणना जगातील सर्वात भयानक प्राण्यांमध्ये होते. अनेकदा वाघ शिकार करतानाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात आणि या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंतीही मिळते. सध्या एक असाच व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात दिसतं की चार वाघ मिळून बदकाची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इवल्याशा बदकाने अशी शक्कल लढवली की चारही वाघांनाच हार मानावी लागली (Duck Playing Hide and Seek With Tigers). व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वाघ शिकारीच्या उद्देशाने बदकाच्या जवळ जातात. एकीकडे वाघ बदकाची शिकार करण्याच्या मूडमध्ये दिसतो. तर दुसरीकडे बदकाला मात्र वाघाची योजना समजते. यामुळे बदक पुढे सरकू लागतो. मात्र किनाऱ्यावर पोहोचताच तीन वाघ बदकावर हल्ला करतात. यानंतर बदक पाण्यात जातो आणि चौघांच्याही तावडीतून स्वतःची सुटका करतो.
  हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत आणि या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, निसर्गाने या पक्षाला शिकाऱ्यापासून वाचवण्यासाठी किती चांगली कला दिली आहे. तर, दुसऱ्या यूजरने लिहिलं, याला म्हणतात आत्मविश्वास असणं. आणखी एकाने म्हटलं, इथे तर लपंडाव सुरू आहे. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

  परीक्षेत कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याचा अजब जुगाड; VIDEO पाहून चक्रावून जाल

  हा मजेशीर व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ onlyfornatures नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, लपंडाव खेळत आहेत. अवघ्या 46 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Tiger attack, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या