Home /News /viral /

परीक्षेत कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याचा अजब जुगाड; VIDEO पाहून चक्रावून जाल

परीक्षेत कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्याचा अजब जुगाड; VIDEO पाहून चक्रावून जाल

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं की एक विद्यार्थी कॉपी करण्यासाठी असं काही करतो, जे पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

  नवी दिल्ली 02 जानेवारी : अनेक विद्यार्थी असे असतात ज्यांना अभ्यास करायला अजिबातही आवडत नाही. अशात काहीही कष्ट न घेता परीक्षेत पास होण्यासाठी ते कॉपी (Copy in Exam) करण्याचा मार्ग अवलंबतात. शाळेत विद्यार्थ्यांनी कॉपी केल्याच्या तक्रारी आपण अनेकदा ऐकल्या असतील. सध्या कॉपीचा असाच एक व्हिडिओ (Viral Video) चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की या विद्यार्थ्याने आपत्तीचं संधीत रूपांतर केलं. अवघ्या दोन वर्षात रस्त्यावर आला अरबपती; ती एक चूक पडली भलतीच महागात आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा देशभरात प्रसार होत आहे. यामुळे पुन्हा एकदा मास्कचा, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम कडक झाले आहेत. मात्र अनेक लोक असेही आहेत, जे मास्कचा चुकीचा फायदा घेतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसतं की विद्यार्थ्याने परीक्षेत कॉपी करण्यासाठी मास्कचा वापर केला.
  व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अनेक विद्यार्थी एकसोबत परीक्षा देण्यासाठी बसलेले आहेत. मात्र यातील एक विद्यार्थी कॉपी करण्यासाठी असं काही करतो, जे पाहून तुम्हीही चक्रावून जाल. या विद्यार्थ्याने मास्कच्या आतील बाजूला कॉपी केली होती. हे पाहून मागे बसलेला विद्यार्थी हैराण होऊन हसू लागतो.

  चिमुकलीचा जबरदस्त क्लासिकल डान्स पाहून घालाल तोंडात बोटं; VIDEO एकदा बघाच

  हा जुगाड सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत म्हटलं, कोणी कल्पनाही करू शकत नाही, की कॉपी अशाप्रकारेही केली जाईल. तर इतरही अनेकांनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Exam, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या