आपण पि्तृपक्षाला कावळ्यांसह, गाय आणि श्वानांना जेवन घालतो. त्यावेळी त्यात 33 कोटी देवांचा वास असल्याने ते कार्य फार पवित्र मानले जातं.
सनातन धर्मानुसार कावळ्याला देवाचा पूत्र मानलं गेलं आहे. रामायणात कावळ्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.
जेव्हा इंद्रपूत्र जयंतने कावळ्याचे रूप धारण करून सीतेच्या पायाला जखम केली होती तेव्हा प्रभू रामाने ब्रह्मास्त्राने त्याचे डोळे फोडले होते. त्यानंतर इंद्रपूत्र जयंतने प्रभू रामाची माफी मागितली होती. त्यावेळी रामाने त्याला वरदान दिले, की तुला अर्पित केलेलं अन्न पितरांना मिळेल.
कावळ्यांना जेवण देणं हे पुण्याचं काम समजले जाते. कारण कावळ्यांना अन्नदान केल्यामुळे पितृदेवता आपल्याला पावतात, अशी आपली श्रद्धा आहे.
जर कावळ्याने अन्नपदार्थ खाऊन गायीच्या पाठीवर आपली चोच रगडली तर हे कार्य सत्करणी लागले, असं समजायचं.