मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नशेत मॉडेलचा रस्त्यावरच धिंगाणा; सैन्याची जिप्सी अडवून जवानाला धक्काबुक्की, संतापजनक VIDEO

नशेत मॉडेलचा रस्त्यावरच धिंगाणा; सैन्याची जिप्सी अडवून जवानाला धक्काबुक्की, संतापजनक VIDEO

ही तरुणी रस्त्याच्या मध्ये उभा राहूनच ये-जा करणाऱ्या वाहनांना अडवू लागली. पाहता पाहता आसपास गर्दी जमा झाली. याचदरम्यान तिथे सैन्याची जिप्सी आली.

  • Published by:  Kiran Pharate

भोपाळ 09 सप्टेंबर : एक तरुणीनं रस्त्यावरच दारू पिऊन (Drunk Model) धिंगाणा घातल्याची एक घटना नुकतीच समोर आली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) ग्वालियर (Gwalior) शहरात घडली आहे. संबंधित तरुणी ही दिल्लीतील मॉडेल असल्याचं म्हटलं जात आहे. ही तरुणी रस्त्याच्या मध्ये उभा राहूनच ये-जा करणाऱ्या वाहनांना अडवू लागली. पाहता पाहता आसपास गर्दी जमा झाली. याचदरम्यान तिथे सैन्याची जिप्सी आली. तरुणीनं ही गाडीदेखील अडवली आणि गाडीजवळच जाऊन उभा राहिली. घटनेचा व्हिडिओ (Shocking Video Viral) समोर आला आहे.

चिमुकलीनं थेट वडिलांच्याच कानशिलात लगावली; बापलेकीचा VIDEO पाहून व्हाल शॉक

काहीवेळातच ही तरुणी गाडीला लाथा मारू लागली यामुळे गाडीची हेडलाईट तुटली. जिप्सीमधून जेव्हा जवान उतरून खाली आला तेव्हा तिनं त्यालाही धक्का दिला. हा सर्व गोंधळ पडाव ठाण्याच्या जवळच सुरू होता. मात्र, ठाण्यात एकही महिला पोलीस नसल्यानं या मुलीला पकडणं शक्य झालं नाही. लोक तिचा व्हिडिओ बनवत राहिले. काही वेळानंतर जेव्हा महिला ठाण्यातून पोलीस आले तेव्हा तिला ताब्यात घेण्यात आलं.

VIDEO : स्कूटी चालू करत होता व्यक्ती; अचानक बाहेर आला कोब्रा अन्...

तरुणीची मेडिकल टेस्ट केली असता ती नशेत असल्याचं उघड झालं. तिला वाचवण्यासाठी दोन महिला ठाण्यात पोहोचल्या. या तिघीही दिल्लीहून आल्या आहेत. मात्र, त्या दिल्लीहून ग्वालियर येथे का आल्या होत्या, हे अद्याप समजू शकलं नाही. या मुलीनं काळ्या रंगाचा स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता. तिचं वय सुमारे 22-23 वर्ष इतकं होतं. ती आसपासच्या हॉटेलमधूनच नशेत रस्त्यावर आली होती. पडाव ठाण्याचे टीआय विवेक अष्ठाना यांचं असं म्हणणं आहे, की रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या मुलीला ताब्यात घेण्यात आलं आहे, तिनं इतका गोंधळ का घातला आणि दिल्लीहून ग्वालियरला का आली, याची चौकशी केली जात आहे.

First published:

Tags: Shocking video viral, Viral news