मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चिमुकलीनं रागात थेट वडिलांच्याच कानशिलात लगावली; बापलेकीचा हा VIDEO पाहून व्हाल शॉक

चिमुकलीनं रागात थेट वडिलांच्याच कानशिलात लगावली; बापलेकीचा हा VIDEO पाहून व्हाल शॉक

एका लहान मुलीचा आणि तिच्या वडिलांचा व्हिडिओ (Video of Little Girl) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलगी आपल्या वडिलांना जोरात चापट मारताना दिसते.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 09 सप्टेंबर : कोरोना (Coronavirus) महामारीमुळे गेल्या बऱ्याच काळापासून शाळा (School) बंद आहेत. त्यामुळे, या काळात लहान मुलांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर (Funny Video of Children's) तर काही हैराण करणारेही असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल (Viral on Social Media) होईल, हे सांगणं अवघड आहे. ज्या गोष्टी सहसा प्रत्यक्षात पाहायला मिळत नाहीत त्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता एका लहान मुलीचा आणि तिच्या वडिलांचा व्हिडिओ (Video of Little Girl) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलगी आपल्या वडिलांना जोरात चापट मारताना दिसते.

रहदारीच्या रस्त्यावर लावलं गेलंय केळीचं झाड; काय आहे हे विचित्र प्रकरण? VIDEO

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर kirik adda या पेजवरून शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की वडील आणि मुलगी दोघंही आपल्या घरामध्ये बसलेले आहेत. वडील आपल्या मुलीसोबत मस्ती करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं, की या मुलीचे वडील तिला प्रेमानं गालात चापट मारतात. मात्र, यानंतर ही चिमुकली आपल्या वडिलांना एकदम जोरात कानशिलात लगावते.

सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धकानं मोडली मान; कुस्तीपटूचा मृत्यू, धक्कादायक VIDEO

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ अतिशय मजेशीर असल्याचं म्हटलं आहे. फेसबुकशिवाय इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. यूजर्स या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं यावर कमेंट करत म्हटलं, की ही मुलगी अतिशय नॉटी आहे. तर आणखी एका यूजरनं यावर कमेंट करत मुलीच्या वडिलांना सल्ला दिला आहे. यूजरनं लिहिलं, की तुम्ही इतक्या लहान मुलीला असं काही शिकवलं तर मोठं होऊन ती अशीच बनेल. त्यामुळे, आपला मुलीला चांगलं काहीतरी शिकवा.

First published:

Tags: Funny video, Video Viral On Social Media