नवी दिल्ली 09 सप्टेंबर : पावसाळा हा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येत असतो. मात्र, यासोबतच पावसाळ्यात अनेक प्राणीही बाहेर निघतात. त्यामुळे या काळात बऱ्याच दिवसांपासून वापरात नसलेल्या गोष्टी वापरण्याआधी त्या योग्य पद्धतीनं तपासणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या सोशल मीडियावर एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल (Shocking Snake Video Viral) होत आहे. यात एका व्यक्तीच्या स्कूटीमधून कोब्रा साप (Cobra Snake Hidden In Scooty) निघाल्याचं पाहायला मिळतं. या व्यक्तीला भनकही नव्हती की त्याच्या स्कूटीमध्ये साप राहत आहे. खुलासा तेव्हा झाला जेव्हा सापामुळे त्याची स्कूटी बंद पडली. जेव्हा मॅकॅनिकनं त्याच्या स्कूटीची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली तेव्हा आतमध्ये कोब्रा पाहून त्याला धक्का बसला.
सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धकानं मोडली मान; कुस्तीपटूचा मृत्यू, धक्कादायक VIDEO
ट्विटरवर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर सुसंता नंदा यांनी या घटनेचा व्हिडिओ (Twitter Video) शेअर केला आहे. स्कूटीवर असलेल्या नंबर प्लेटनुसार ही घटना तेलंगणामधील आहे. हा व्हिडिओ खरंतर एका वर्षापूर्वीच समोर आला होता. मात्र, ऑफिसरनं शेअर केल्यानंतर तो आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ही घटना अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. यात स्कूटीच्या समोरच्या भागात कोब्रा दिसत आहे. 2 मिनिट 7 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो जणांनी पाहिला आहे.
Such guests during rains are common... But uncommon is the method used to rescue it. Never ever try this😟 pic.twitter.com/zS4h5tDBe8
— Susanta Nanda IFS (@susantananda3) September 7, 2021
ऑफिसरनं व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं, की पावसाळ्यात असे पाहुणे कॉमन आहेत. पावसाळ्यात साप आणि कीटक बाहेर पडतात. यामुळे या काळात अनेकदा अशा बातम्या येतात ज्यात हे प्राणी अशा ठिकाणी लपून बसलेले असतात जिथे कोणी कल्पनाही केलेली नसते. चपलांपासून टॉयलेटपर्यंत अनेक ठिकाणी साप आढळल्याच्या घटना समोर येत राहतात. अशात ऑफिसरनं लिहिलं, की यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की कोब्रा अतिशय आरामात स्कूटीच्या समोरच्या भागात बसलेला आहे. कोणी विचारही करू शकत नाही, की साप इथेही बसू शकतो.
महिलेनं कचरापेटीत फेकलं स्वतःचं बाळ; सोशल मीडियावर व्हायरल झाला Shocking Video
या व्हिडिओमधील कोब्रा तर लोकांना हैराण करतच आहे मात्र त्याच्या रेस्क्यूचा व्हिडिओही सर्वांचं लक्ष वेधत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाण्याच्या मोठ्या बाटलीच्या सहाय्यानं सापाला पकडताना दिसत आहे. या व्यक्तीनं अत्यंत आरामात कोब्राला बाटलीत शिरू दिलं. यानंतर त्यानं सापाला पूर्णपणे बाटलीत भरलं आणि पॅक केलं. सुसंता नंदा यांनी लोकांना अशी पद्धत न वापरण्याचं आवाहन रेलं आहे. इतरही अनेकांनी साप पकडण्याची ही पद्धत घातक असल्याचं म्हटलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.