वॉशिंग्टन, 12 जुलै : माणसाला कुत्रा चावल्याऐवजी, कुत्र्याला माणूस चावला असं चुकीचं लिहिलं आहे, असं तुम्हाला वाचताच क्षणी वाटेल. तुम्ही कुत्रा चावल्याच्या बऱ्याच प्रकरणं पाहिली असलीत. पण कधी माणसाने कुत्र्याला चावल्याचं आणि माणूस चावल्याने कुत्रा रुग्णालयात दाखल झाल्याचं ऐकलं तरी आहे का? कदाचित नाही. पण ही चूक नाही तर सत्य घटना आहे. एक माणूस डॉगला चावला आणि त्या डॉगला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. अमेरिकेतील हे विचित्र प्रकरण आहे. डेलावेअरमध्ये घडलेली ही घटना. एका वाहनचालकाने ट्रॅफिल रूल तोडला. त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी पोलिसांचा डॉगही सोबत होता. आधीच वाहतूक नियम मोडून मोठी चूक केली. त्यानंतर तर या व्यक्तीने क्रुरतेचा कळस गाठला. तो चक्क पोलिसांच्या कुत्र्याला चावला.
जमाल विंग असं या आरोपीचं नाव आहे. 47 वर्षांचा जमाल गाडी चालवताना नशेत होता. दारू पिऊन तो गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला पकडलं आणि गाडीत बसायला सांगितलं. पण तो काही ऐकत नव्हता. गाडीत बसायलाच तो तयार नाही. Shocking! लाइव्ह रिपोर्टिंगवेळी श्वानाने रिपोर्टरला फरफटत नेलं; पाहा LIVE VIDEO अखेर पोलिसांनी आपल्या प्रशिक्षित श्वानाला समोर आणलं. जेणेकरून डॉग चावेल या भीतीने तरी तो गाडीत बसेल. पण तो कसला घाबरतो आहे. श्वान चावण्याआधी तोच श्वानाला चावला. जमालने एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल 12 वेळा त्याने श्वानाला चावा घेतला. तो असा चावला की डॉग गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. कसंबसं पोलिसांनी जमालला कंट्रोल केलं. त्यालाही दुखापत झाली. त्यालाही रुग्णालयात नेण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उशिरा रात्री अटकेपासून वाचण्यासाठी नशेत असलेला हा आरोपी डॉगला खूप वेळा चावला. VIRAL VIDEO - खेळता खेळता चिमुकल्याने पिटबुलच्या डोक्यात मारली बाटली; पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहूनच भरेल धडकी सध्या त्याच्यावर ऑन ड्युटी पोलीस अधिकारी आणि त्यांच्या श्वानावर हल्ला केल्याचा, वेगात गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल आहे. त्याला मुद्दामहून अटकेला विरोध करण्याचा, चुकीचं वागणं, आवश्यक लायसेन्स नसणे असेही चार्ज लावण्यात आले आहेत.