जाहिरात
मराठी बातम्या / Viral / इंटरनेटवर का होतेय Dosa Printer ची चर्चा, खरंच पेपर प्रमाणे प्रिंटरमधून डोसा येणार? पाहा व्हिडीओ

इंटरनेटवर का होतेय Dosa Printer ची चर्चा, खरंच पेपर प्रमाणे प्रिंटरमधून डोसा येणार? पाहा व्हिडीओ

इंटरनेटवर का होतेय Dosa Printer ची चर्चा, खरंच पेपर प्रमाणे प्रिंटरमधून डोसा येणार? पाहा व्हिडीओ

बाजारात आलाय Dosa Printer, आता मेहनत न करता झटपट बनवा डोसा, पाहा व्हिडीओ

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 25 ऑगस्ट : तंत्रज्ञान दिवसेंदिवस इतकं विकसित होऊ लागलं आहे की, आपण ज्या गोष्टींचा आधी विचार देखील करु शकत नव्हतो, अशा गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. जे आपल्याला कामात मदत करते आणि आपला वेळ देखील वाचवते. आता हेच बघा ना सुरुवातीच्या काळात मसाला बारीक करण्यासाठी पाट्याचा वापर केला जायचा, ज्याची जागा नंतर मिक्सरने घेतली. ज्यामुळे स्वयंपाक करणं सोपं झालं. अशापद्धतीने नंतर डिशवॉशर, हँड ब्लेंडर अशी सर्व उपकरणे उपलब्ध होत गेली. जी लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग देखील बनली. या सर्वांच्या मदतीने कोणीही स्वयंपाक अगदी सहजतेने करू शकतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत. जी पाहून तुम्ही नक्की म्हणाली, ‘‘अरेच्चा! असं पण असतं का?’’ हो, कारण बाजारात ‘डोसा प्रिंटर’ आला आहे, ज्याचा वापर करुन तुम्ही डोसा बनवू शकता. ‘डोसा प्रिंटर’ चा व्हिडीओ शेअर होताच सोशल मीडियाच्या दुनियेत तो भलताच व्हायरल झाला आहे. हे वाचा : मार्केटमध्ये आलाय BED AC, अवघ्या काही मिनिटांत घर होईल थंडा-थंडा कूल-कूल तसे पाहाता काही लोकांसाठी डोसा बनवणं सोपं असलं तरी, असे अनेक लोक आहेत, ज्यांना डोसा खायला फार आवडतो, परंतु त्यांना तो बरोबर बनवता येत नाही किंवा तो बनवताना तुटतो, तर कधी तो कुरकुरीत होत नाही. तर अशा लोकांसाठी हा ‘डोसा प्रिंटर’ खरोखरंच खूप फायदेशीर ठरु शकतो.

जाहिरात

हा ‘डोसा प्रिंटर’कसा वापरायचा? या व्हिडीओमध्ये दाखवलं गेलं आहे. व्हिडीओमध्ये हा असा डोसा तयार होताना पाहून सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत आहे. हे वाचा :विना इंटरनेटही करता येतं UPI पेमेंट; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स या अनोख्या डोसा मेकरचा व्हिडीओ @NaanSamantha या ट्विटर हँडलने २३ ऑगस्ट रोजी शेअर केला आहे. ज्यानंतर अगदी काही तासातच या व्हिडीओला 10 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 20 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो वापरकर्ते यावर सतत प्रतिक्रिया देत आहेत. काही वापरकर्त्यांनी त्यांना हे मशीन विकत घ्यायचे आहे असे लिहिले तर काहींनी ते निरुपयोगी असल्याचे सांगितले. आता हे मशीन नक्की कसं काम करतं हे तर तुम्हाला ते मशीन वापरुनच कळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात