मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

मार्केटमध्ये आलाय BED AC, अवघ्या काही मिनिटांत घर होईल थंडा-थंडा कूल-कूल

मार्केटमध्ये आलाय BED AC, अवघ्या काही मिनिटांत घर होईल थंडा-थंडा कूल-कूल

 सूर्य चांगलाच तापू लागल्याने तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णता आणि उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. पंखा (Fan) आणि कूलर (Cooler) लावूनही उकाड्यापासून पूर्णपणे सुटका मिळत नाही. सध्या फक्त एसी (Air Conditioner) हाच एकमेव पर्याय आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे एसी उपलब्ध आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 एप्रिल-   सूर्य चांगलाच तापू लागल्याने तापमानाचा पारा वाढला आहे. उष्णता आणि उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. पंखा (Fan) आणि कूलर (Cooler) लावूनही उकाड्यापासून पूर्णपणे सुटका मिळत नाही. सध्या फक्त एसी (Air Conditioner) हाच एकमेव पर्याय आहे. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे एसी उपलब्ध आहेत. भिंतीवर आणि खिडकीत बसवण्यात येणाऱ्या एसींचे अनेक पर्याय तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील. दोन्ही एसी काही मिनिटांत खोली थंड करतात. आज आम्ही तुम्हाला अशा एसीबद्दल सांगणार आहोत, जो मॅट्रेसमध्ये म्हणजेच बेडच्या गादीमध्ये बसवण्यात येतो. हा एसी अगदी काही वेळातच बेड थंड करतो. बेडवर बसताच तुम्हाला एक अद्भुत थंडावा अनुभवायला मिळेल. तुमच्यापैकी अनेकांना याबद्दल माहिती नसेल. चला तर जाणून घेऊया या एसीबद्दल... या एसीची किंमत किती? हा एसी खूप महाग नसून मिडलक्लास (Middleclass) लोकांच्या बजेटमध्ये बसणारा आहे. हा एसी Alibaba.com वर 15 ते 16 हजार रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. हा एसी एक नव्हे तर दोन युनिटचा बनलेला आहे. दोन्ही युनिट्स एकत्र करून AC पूर्ण होतो. त्यानंतर तो तुम्हाला वापरता येतो. एसी कसा काम करतो? हा एअर कंडिशनर एका मॅट्रेससह येतो. या मॅट्रेसमध्ये एसी पाईपद्वारे जोडला जातो. एसी पाईपला जोडल्याबरोबर गादी थंड होते. पाईपमधून हवा गादीमध्ये जाते आणि बसलेल्या किंवा पडलेल्या व्यक्तीला कमालीची थंड हवा मिळते. हा एसी बेडच्या बाजूला ठेवलेला असतो, त्यातून पाईपने मॅट्रेसमध्ये कनेक्शन दिलं जातं. या संदर्भात झी न्यूज हिंदीनं वृत्त दिलंय. भिंतीवर बसवलेले किंवा खिडकीत बसवलेले एसी पूर्ण रुम थंड करतात. रुम मोठी असल्यास थंड व्हायला जास्त वेळ लागतो, तोपर्यंत तुम्हाला उकाड्यात बसून राहावं लागतं. परंतु, हा एसी फक्त बेड थंड करतो, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही. शिवाय हा एसी जास्त महाग नसल्यानं चांगला पर्याय ठरू शकतो. फक्त बेड थंड करत असल्यानं या एसीला वीज पण जास्त लागणार नाही, त्यामुळे वीजेची बचतदेखील होईल आणि उन्हाळ्यात उकाड्यापासून सुटका होऊन तुम्हाला शांत झोप मिळेल. तुम्हीही एवढ्यात एसी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या बजेट आणि इतर गरजांनुसार हा एसी योग्य आहे की नाही, याची चाचपणी करता येईल.
    First published:

    Tags: Technology

    पुढील बातम्या