मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking video : रस्त्यावर हलताना दिसला 'काळा दगड'; सत्य समजताच लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं

Shocking video : रस्त्यावर हलताना दिसला 'काळा दगड'; सत्य समजताच लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं

रस्त्यावर हलणाऱ्या काळ्या दगडाला लोकांनी हात लावताच त्यांना धक्काच बसला.

रस्त्यावर हलणाऱ्या काळ्या दगडाला लोकांनी हात लावताच त्यांना धक्काच बसला.

रस्त्यावर हलणाऱ्या काळ्या दगडाला लोकांनी हात लावताच त्यांना धक्काच बसला.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 08 सप्टेंबर : रस्त्यावर (Road) चालताना एखादी निर्जीव वस्तू तुम्हाला हलताना दिसली तर तुमचं काय होईल. साहजिकच सुरुवातीला धडकी भरेल (Shocking video), घाम फुटेल, खूप भीती वाटेल. पण नेमकी ती वस्तू काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकताही तितकीच असते. त्यामुळे घाबरत घाबरत का नाही पण आपण त्या वस्तूजवळ जातो आणि ते नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

एका रस्त्याच्या काम सुरू होतं. त्या रस्त्याच्या किनाऱ्यावर एक काळा दगड होता, जो चक्क हलताना दिसत होता (Black stone suddenly started shaking on road). सुरुवातीला हा हलणारा दगड पाहून आश्चर्यच वाटलं. पण लोकांनी उत्सुकतेपोटी जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना धक्काच बसला. कारण हा हलणारा काळा दगड निर्जीव दगड नव्हता तर तो एक चक्क जीव होता. तो एक कुत्रा होता (Dog on road).

एका रस्त्याचं काम सुरू होतं. या रस्त्याच्या किनाऱ्यावर हा कुत्रा सापडला. त्याच्यावर रस्ता बनवण्यासाठी वापरलेलं डांबर पडलं होतं. त्याला हलताही येत नव्हतं. पण त्याचा श्वास सुरू होता. त्याचं पोट हलताना दिसलं. लांबून पाहिलं तर एखादा काळा दगडच हलतो आहे, असंच वाटतं.

हे वाचा - ...अन् शिकारीच झाला शिकार, एका क्षणात खेळ खल्लास; पाहा थरारक VIDEO

या कुत्र्याची जीवनमृत्यूशी झुंज सुरू होती. लोकांना हा कुत्रा आहे हे समजताच त्याला वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. त्यांनी तिथंच त्या कुत्र्यावरील डांबर हटवायला सुरुवात केली. त्याचं संपूर्ण शरीर स्वच्छ केलं.  या कुत्र्याला लोकांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे. कुत्र्याला दुसरं आयुष्यच मिळालं. कुत्रा चांगला होताच त्याला पोटभर खाऊही घालण्यात आला. आता तो आनंदाने जगतो आहे. आधीसारखाच खेळताना, मजा करताना दिसतो आहे.

हे वाचा - तरुणाच्या अंगात संचारला 'भल्लालदेव'; बैलाची शिंगं धरली आणि... Shocking Video

सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो. काळजाचं पाणी पाणी होतं आणि डोळ्यात पाणीही येतं. ज्या लोकांनी या मुक्या जीवाला वाचवलं आहे, त्यांचं कौतुक केलं जातं आहे.

First published: