Home /News /viral /

कोंबड्यांना पाहून आधी छाती ताणून भू भू भुंकला, नंतर आवाजच बंद झाला; कुत्र्यासोबत नेमकं काय घडलं पाहा VIDEO

कोंबड्यांना पाहून आधी छाती ताणून भू भू भुंकला, नंतर आवाजच बंद झाला; कुत्र्यासोबत नेमकं काय घडलं पाहा VIDEO

Dog and chickens video : कुत्रा आणि कोंबड्यांचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  मुंबई, 07 डिसेंबर : अपने घर में तो कुत्ता (Dog video) भी शेर होता है, हे तुम्ही ऐकलंच असेल. फक्त दुरून हिंमत दाखवणाऱ्या आणि जवळ येतात घाबरणाऱ्या माणसांना टोमणा मारण्यासाठी ही म्हण वापरली जाते. या म्हणीत कुत्र्याचाच संदर्भ का देण्यात आला याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. कुत्र्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला बिलकुल हसू आवरणार नाही (Dog funny video). कुत्रा आणि कोंबड्यांचा (Dog and chickens video) हा व्हिडीओ आहे. कुत्रा सुरुवातीला कोंबड्यांवर जोरजोरात भुंकतो. पण जेव्हा या कोंबड्या त्याच्या अगदी जवळ येतात तेव्हा मात्र अगदी छाती ताणून मोठ्या आवाजत भुंकणाऱ्या या कुत्र्याची बोलतीच बंद होते. त्याची हवाच टाईट होते. त्याची अवस्था पाहून हसूसुद्धा येईल आणि त्याची दयादेखील वाटेल. नेमकं असं काय घडलं आहे ते तुम्हीच व्हिडीओत पाहा.
  व्हिडीओत पाहू शकता एका गेटच्या आता काही कोंबड्या आहेत. त्यांना पाहून कुत्रा तिथं धावत येतो. गेटच्या बाहेर असलेल्या हा कुत्रा गेटच्या आतील कोंबड्यांना पाहून जोरजोरात भुंकू लागतो. अगदी छाती ताणून तो कोंबड्यांवर भुंकतो. त्याचा रूबाब पाहून जणू तो स्वतःला सिंहच समजतो की काय असंच वाटतं. हे वाचा - त्रास देणाऱ्या कोंबडीला मांजरीने अशी घडवली अद्दल; VIDEO पाहून वाटेल कौतुक पण व्हिडीओचा पुढील ट्विस्ट पाहाल तर हसून हसून लोटपोट व्हाल. कुणीतरी या कुत्र्याला उचलतं आणि गेटच्या आत जिथं कोंबड्या आहेत तिथं सोडतं. त्याचवेळी कुत्रा घाबरलेला दिसतो. तिथं पाय ठेवायलाही तो घाबरत असतो. ती व्यक्ती तरी त्या कुत्र्याला तिथं सोडतं. कुत्रा आत येताच कोंबड्या त्याला घेरतात. कोंबड्या जवळ येताच कुत्र्याची हवा टाईट होते. गेटच्या बाहेरून भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज गेटच्या आत जाताच बंद होतो. कोंबड्यांच्या भीतीने एका कोपऱ्यात गेटला चिकटून राहतो आणि गेटवर हात फिरवत राहतो. कुणीतरी मला बाहेर काढा असंच जणू तो सांगतो आहे. हे वाचा - शेळीने कुत्र्याची केली वाईट अवस्था; मदत करण्याऐवजी हसत राहिले लोक, VIDEO asupan.reels.hewani नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Chicken, Dog, Other animal, Pet animal

  पुढील बातम्या