बंगळुरू, 07 डिसेंबर : वाद, मारहाण, चोरी अशा तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवल्या जातात. पण एक शेतकरी मात्र आपल्या गायीची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. आपली गाय दूध देत नाही (Cow not giving milk) आता तुम्हीच तिला समजला अशी विनवणी शेतकऱ्याने चक्क पोलिसांना केली. शेतकऱ्याची अशी तक्रार ऐकून पोलीस अधिकारीही हैराण झाले (Farmer complaint about cow at police station).
सामान्यपणे पाळीव प्राण्यांसंबंधी कोणती समस्या असेल तर प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेलं जातं. पण हा शेतकरी आपल्या गायीला पोलिसांकडे घेऊन आला. कर्नाटकच्या (Karnataka) शिमोगो जिल्ह्यातील ही घटना आहे (Karnataka cow police complaint). सिदलीपुरा गावातील शेतकरी रमैयाने होलेहोन्नूर पोलीस ठाण्यात ही अजब तक्रार दिली आहे. चारा खायला घातल्यानंतरही आपली गाय दूध देत नाही आहे, असं त्याने सांगितलं.
डेक्कन हेराल्डच्या रिपोर्टनुसार शेतकऱ्याने सांगितलं, तो दररोज सकाळी 8 आणि रात्री 11 वाजता आपल्या गायीला चारा खायला घेऊन जातो. संध्याकाळी 4 आणि 6 वाजताही तो तिला चारा देतो. पण तरी गेल्या 4 दिवसांत तिने दूध दिलं नाही आहे. गायीला दूध देण्यासाठी आता तुम्हीच तिला तयार करा.
हे वाचा - कोंबड्यांसमोर आधी भुंकला नंतर आवाजच बंद झाला; कुत्र्यासोबत काय घडलं पाहा VIDEO
शेतकऱ्याची ही समस्या ऐकून पोलीसही हैराण झाले. त्यांनी कसंबसं त्या शेतकऱ्याला समजावलं. आपण या समस्येचं निवारण करू शकत नाही, अशी तक्रार नोंदवली जात नाही, असं सांगून त्यांनी त्या शेतकऱ्याला घरी परत पाठवलं.
याआधी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) भिंड जिल्ह्यातही अशाच एक विचित्र प्रकार समोर आला होता. येथील एक शेतकरी आपली म्हैस घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला होता. म्हशीवर कोणीतरी काळी जादू केल्यामुळे तिने दूध देणं बंद केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. (The farmer brought the buffalo to the police station for not giving milk Officers shocked )
पोलीस अधिक्षक अरविंद शाह यांनी सांगितलं की, बाबुलाल जाटव (45) यांनी शनिवारी नयागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची म्हैस गेल्या काही दिवसांपासून दूध देत नसल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. शेतकऱ्याने सांगितलं की, काही गावकऱ्यांनी शेतकऱ्याला सांगितलं की, म्हशीवर कोणीतरी जादूटोना केला आहे. यानंतर शेतकरी म्हशीला घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. आणि पोलिसांकडे मदतीचं आवाहन केलं होतं.
हे वाचा - शेळीने कुत्र्याची केली वाईट अवस्था; मदत करण्याऐवजी हसत राहिले लोक, VIDEO
यावर पोलिसांनी पशूच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना दिला. त्यानंतर गावकरी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांचे आभार मानू लागले. कारण यानंतर म्हशीने दूध दिल्यामुळे शेतकऱ्याची चिंता मिटली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Pet animal, Police complaint, Viral