नवी दिल्ली 23 जुलै : माणूस आणि कुत्रा यांचं नातं खूप खास असतं. एकवेळ माणसाच्या मनात धूर्तपणाची भावना निर्माण होऊ शकते, परंतु कुत्रा नेहमी त्याच्या मालकाशी एकनिष्ठ असतो. तो काही काळ आपल्या मालकापासून दूर राहिला तरी, जेव्हा जेव्हा तो मालकाला भेटतो तेव्हा त्याला लगेचच ओळखतो. सध्या हेच दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जे काही दिसतं ते पाहून तुम्ही भावूक व्हाल. काही दिवसांपूर्वी @positivelearner नावाच्या Instagram अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता, जो व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाला 3 वर्षांनी भेटताना दिसतो. इतक्या वर्षांनंतर भेटूनही तो त्याच्या मालकाला ओळखतो. पण तो ज्या पद्धतीने मालकाला ओळखतो तो क्षण पाहून तुम्ही नक्कीच भावूक व्हाल. आपल्या सर्वांना माहिती आहे, की कुत्र्यांमध्ये वास घेण्याची क्षमता अफाट असतो. या व्हिडिओमध्येही हा कुत्रा याचाच फायदा घेताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस बाकावर बसलेला दिसत आहे आणि एक कुत्रा त्याच्यावर मागून भुंकत आहे. तिथे एक महिलाही उभी आहे, जी कुत्र्याला त्या व्यक्तीकडे घेऊन जात आहे. सुरुवातीला कुत्रा त्या व्यक्तीला ओळखत नाही कारण त्याची दाढीही खूप वाढली आहे. पण त्या व्यक्तीचा वास येताच त्याला सर्व गोष्टी आठवतात आणि ती व्यक्ती कोण आहे हे त्याला समजतं. अशाप्रकारे, तो 3 वर्षांनी भेटूनही आपल्या मालकाला ओळखतो आणि नंतर उड्या मारत त्याच्यावर प्रेम करू लागतो. माणसांनाही लाज वाटेल असं कावळ्याने केलं काम; VIDEO सोशल मीडियावर तुफान VIRAL या व्हिडिओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटलं, की खरं प्रेम कधीच संपत नाही. हे पाहून डोळ्यात पाणी येत असल्याचं एकाने सांगितलं. एका महिलेनं म्हटलं की, ही स्टोरी अपूर्ण आहे. खरं तर मालकाची तब्येत खराब होती, त्यामुळे त्यांना बराच काळ रुग्णालयात राहावं लागलं. त्याचं वजन कमी झालं. त्यामुळे कुत्रा त्याला ओळखू शकला नाही, पण जेव्हा त्याला मालकाचा वास आला तेव्हा त्याला समजलं की तो कोण आहे.