नवी दिल्ली, 22 जुलै : हुशार कावळ्याची गोष्ट तर तुम्हाला माहितीच असेल. कावळ्याची ही हुशारी फक्त गोष्टीपुरताच मर्यादित नाही. तर प्रत्यक्षातही कावळा तितकाच हुशार आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. जे माणसांना समजलं नाही ते कावळ्याला समजलं आहे. त्यानं असं काम करून दाखवलं आहे, जे पाहिल्यावर माणसांनाही लाज वाटेल. कावळ्याच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जे काम माणसांनी करायला हवं पण ते करत नाही, ते कावळ्याने केलं आहे. या कावळ्याचं कृत्य पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. कावळ्याने माणसांना मोठा धडा दिला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक कावळा उडत येतो. त्याच्या चोचीत प्लॅस्टिकची रिकामी बाटली आहे. कावळा चोचीत बाटली धरतो आणि एका डस्टबिनवर येऊन बसतो. त्यानंतर डस्टबिन कुठून खुलं आहे ते बघतो. तोपर्यंत तो चोचीतील बाटली सोडत नाही. जशी त्याला डस्टबिनमध्ये बाटली टाकण्याची जागा मिळते, तशी तो तिथून बाटली डस्टबिनमध्ये टाकतो आणि तिथून उडून जातो. Shocking! घोडाही असं करू शकतो? VIRAL VIDEO पाहून सर्वांनाच बसला धक्का तिथं उपस्थित लोकही कावळ्याकडे पाहतच राहतात. त्याचं हे काम पाहून सर्वजण टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करतात. स्वच्छतेसंबंधी अनेक मोहिमा राबवल्या जातात. जनजागृती केली जाते. तरी लोक सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकतात. अगदी डस्टबिनमध्ये कचरा फेकायचा झाला तरी तो डस्टबिनच्या बाहेरच असतो. पण या कावळ्याने मात्र तसं केलं नाही. त्याने बरोबर डस्टबिनच्या आतच कचरा फेकला आहे. कचरा उघड्यावर टाकण्यापेक्षा तो डस्टबिनमध्ये टाकून स्वच्छता राखण्यात हातभार लावला पाहिजे, असा धडा या कावळ्याने माणसांना शिकवला आहे. Viral Video: प्रवासी उभे होते अन् कुत्रा सीटवर झोपलेला; मग लोकांनी जे केलं ते पाहून व्हाल चकित @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या कावळ्यासारखे व्हा, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
Be like this raven😊 pic.twitter.com/fyMhMqBWQJ
— Tansu Yegen (@TansuYegen) July 20, 2023
या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरसने जर पक्ष्यांना मानवी कचरा उचलण्याचे प्रशिक्षण दिले जात असेल तर ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे असं म्हटलं आहे. तर एकाने माणसांनी पक्ष्यांकडून शिकायला हवं, असा सल्ला दिला आहे.