कुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; पाहा VIRAL VIDEO

कुत्रा लंगडतोय म्हणून त्याने खर्च केले 29 हजार, समोर आलं भलतच सत्य; पाहा VIRAL VIDEO

अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी कहाणी याठिकाणी घडली आहे. कुत्र्याच्या प्रेमामुळे या व्यक्तीला 300 पाउंड्सचा म्हणजे साधारणपणे 29 हजार 800 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला.

  • Share this:

लंडन, 20 जानेवारी: कुत्रा हा अनेक माणसांचा सगळ्यात जवळचा आणि अत्यंत इमानदार मित्र असतो. हे मैत्रिचं नात सांगणारी अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजूला आहेत. दरम्यान हिंदी-मराठी तसंच इतरही अनेक भाषांमधून या नात्याविषयी भाष्य करण्यात आलं आहे. पण या चित्रपटांचा विषय काढण्याचं कारण काय? असं तुम्ही विचाराल. आज कारण तसंच आहे. ज्याप्रमाणे माणूस कुत्र्याला जीव लावतो तसंच कुत्र्याचाही त्याच्या मालकावर प्रेम असतं.  लंडनमधील एका मालकाला हे कुत्र्याचं प्रेम 300 पाउंड्सना पडलंय. अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी कहाणी याठिकाणी घडली आहे. कुत्र्याच्या प्रेमामुळे या व्यक्तीला 300 पाउंड्सचा म्हणजे साधारणपणे 29 हजार 800 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला.

अनेकदा कुत्र्यांना वेगेवगळी ट्रेनिंग दिली जातात. आपला मालक आजारी असेल तर ते ओळखणं, त्याला मदत करणं असं ट्रेनिंगही दिलं जातं. या ट्रेनिंगमुळे हे श्वान देखील माणसाबद्दलची आपुलकी व्यक्त करतात. त्याचं झालं असं की लंडनमध्ये राहणाऱ्या रसेल जोन्स याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात रसेल आणि त्याचा कुत्रा चालताना दिसत आहे.  या कुत्र्याचं नाव आहे बिल. रसेलच्या एका पायाला प्लॅस्टर लावल्याने तो लंगडतो आहे आणि त्याच्याबरोबर चालणारा त्याचा कुत्राही लंगडतो आहे असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.  हा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला आहे.

(हे वाचा-IPL 2021 : आयपीएल टीम आज करणार अंतिम खेळाडूंची घोषणा, या दिग्गजांना डच्चू?)

दरम्यान या व्हायरल व्हिडीओमागची गंमत अशी आहे की,  कुत्र्याला लंगडताना पाहून रसेलला वाटलं की कुत्र्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानी व्हेटर्नरी डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घेतली. त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की कुत्र्याच्या पायला काहीही झालेलं नाही. बिल एकदम ठणठणीत बरा होता. मग प्रश्न होता तो लंगडत का होता? त्याचं उत्तर म्हणजे मालकावरचं प्रेम. मालक लंगडत चालतोय हे पाहून त्याच्या बद्दलची आपुलकी करण्यासाठी बिलही त्याच्या प्रमाणे नक्कल करून लंगडत चालत होता. पण क्षणाकरता हे प्रेम बाजुला सारलं तर रसेलला बसलेला भुरदंड सर्वांच्या लक्षात येईल. रसेलला बिलच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांना 300 पाउंड द्यावे लागले. थोडा विचार केल्यानंतर बिल हे सहानुभुतीसाठी करत असल्याचं रसेलच्या लक्षात आलं.

(हे वाचा-विशाल अजगराला काठीनं उचलत होता पोलीस आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO)

इंटरनेटवर कुत्र्या-मांजरांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हा व्हिडीओ देखील अशाच प्रकारे व्हायरल झाला आहे. तुम्ही बारकाईने हा व्हिडिओ पाहिलात तर बिल रसेलची हुबेहूब नक्कल करताना दिसतो आहे. रसेल जसा अडखळत चालतोय तसाच बिलही अडखळत चालतोय. स्काय न्यूज ऑस्ट्रेलियाशी बोलताना रसेल म्हणाला, ‘मी बिलच्या पायाचा एक्स-रे काढला. पण त्यानंतर त्याला काहीही झालेलं नाही हे स्पष्ट झालं. तो केवळ माझ्यावरील प्रेमापोटी लंगडत होता. पण मला 300 पाउंडचा भुर्दंड झाला.’

या व्हिडीओवर वेगवेगळया भारी प्रतिक्रिया पडल्या आहेत. एकाने म्हटलं आहे की, माझा कुत्रा मी झोपल्यावर रात्री माझ्या शेजारी झोपून असतो आणि मी उठत नाही तोपर्यंत तो ही उठत नाही. मी जेवेपर्यंत तो जेवतही नाही.'  एका युजरने अशी प्रतिक्रिया दिली आहे, ‘माझा अनुभव असा आहे की कुत्रे तुमच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी असं वागतात.’

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 20, 2021, 12:09 PM IST

ताज्या बातम्या