लखनऊ, 19 जानेवारी : एखादा अजगर (python) फिल्ममध्ये पाहिला तरी अंगावर काटा येतो. अवाढव्या अजगराला पकडल्याचं दृश्यं तसं आपण अनेकदा आपण चित्रपटात पाहिलं आहे आणि त्यावेळी अजगराला हल्ला करताना पाहून आपल्यालाही घाम फुटतो. अशीच घटना प्रत्यक्षात घडली आहे. जिथं विशाल अजगराला पकडण्याचा पोलिसानं प्रयत्न केला आणि अजगरानं पोलिसावर हल्ला केला आहे. सोशल मीडियावर (social media) हा व्हिडीओ (video) व्हायरल (viral) होतो आहे.
उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील ही धक्कादायक घटना. लच्छीखेडा गावाबाहेर 10 फुटांचा साप फिरत होता. रस्त्यावर इतका मोठा अजगर पाहून सर्वांनाच घाम फुटला. गावात खळबळ उडाली. ग्रामस्थांनी लगेच पोलीस आणि वनविभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाची टीम येण्याआधीच एक पोलीस घटनास्थळी दाखल झाला. पोलिसानं आपल्या हातातील काठीच्या सहाय्यानं अजगराला उचलण्याचा प्रयत्न केला. तितक्यात अजगरानं पोलिसावर हल्ला केला.
हे वाचा - OMG! महिलेनं चक्क हत्तीकडून करून घेतला मसाज; पाठीवर पाय ठेवला आणि... VIDEO VIRAL
व्हिडीओत पाहू शकता पोलीस अजगराजवळ आपली काठी नेत असतो. अजगर ती काठी आपल्या तोंडात घेण्याचा प्रयत्न करतो. असं करत असताना मध्येच अजगर इतका चवताळतो की तो पोलिसावर हल्ला करण्याचा प्रयत्नही करतो. सुदैवानं पोलीस त्याच्यापासून काही अंतर दूर असल्यानं तो बचावतो.
काही वेळातच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि अथक प्रयत्नांनी अजगराला पकडलं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अजगर इतका मोठा होता की वन कर्मचाऱ्यांनादेखील त्याला पकडता येत नव्हतं. भरपूर वेळ प्रयत्न केल्यानं त्यांनी अजगराला पकडलं आणि जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं. अजगराचं रेस्क्यू ऑपरेशन सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
हे वाचा - क्रौर्याचा कळस! या मुक्या जीवाला काठीने इतकं मारलं की गेला जीव
काही दिवसांपूर्वीच मुंबईत एका घरात अजगर घुसला होता. त्यामुळे पोलीस दलातील धाडसी कर्मचाऱ्यानं त्याला घराबाहेर काढलं. धारावीतील एका घरात रात्री अचानक अजगर शिरल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळासाठी भीतीचंही वातावरण झालं. मात्र पोलीस दलातील मुरलीधर जाधव यांनी त्याला घरातून बाहेर काढलं आणि भयभीत झालेल्या नागरिकांची सुटका केली. अजगर घरात शिरल्यानं काल धारावीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अजगराला पकडताच लोकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला आणि पोलिसांचं अभिनंदन केलं.