धनंजय कुमार/पाटणा, 03 नोव्हेंबर : सामान्यपणे माणसाच्या पोटी माणूस आणि प्राण्याच्या पोटी तोच प्राणी जन्माला येतो. पण सध्या असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. चक्क एका कुत्र्याने बकरीला जन्म दिला आहे. कुत्र्याचं पिल्लू हुबेहूब बकरीसारखं दिसेल. बकरीसारख्या दिसणाऱ्या या कुत्र्याच्या पिल्लाचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. बिहारमधील हे विचित्र प्रकरण आहे.
गोपालगंजच्या हरपूर टेग्रही गावातील ज्या कुत्र्याने विचित्र पिल्लाला जन्म दिला आहे. गावातच राहतो. गावातील लोक त्याला खायला देतात. काही दिवसांपूर्वी एका घरात तिने पिल्लांना जन्म दिला. जेव्हा या गावात कुत्र्याच्या पिल्लांचा जन्म होतो तेव्हा त्यापैकी चांगलं वाटणारं पिल्लू गावातील कुणीतरी आपल्या घरी नेऊन पाळतं. त्यामुळे जेव्हा या श्वानाची प्रसूती झाली तेव्हा लोक पिल्लांना पाहायला गेले तेव्हा सर्वांना धक्काच बसला.
या कुत्र्याने 8 पिल्लांना जन्म दिला. त्यातील 7 पिल्लांचा चेहरा आणि वागणं श्वानाच्या पिल्लांप्रमाणेच सामान्य आहे. पण एक पिल्लू मात्र सर्वांपेक्षा वेगळं... खूपच वेगळं आहे. हे पिल्लू बकरीच्या पिल्लासारखं आहे. सुरुवातीला लोकांना वाटलं की एखाद्या बकरीचं पिल्लू या पिल्लांमध्ये आलं असावं. त्यांनी आसपासला याची चौकशी केली. पण ते पिल्लू कुणाचंच नव्हतं.
कुत्र्याच्या पोटी बकरीसारख्या पिल्लाचा जन्म, हे पाहून सामान्य नागरिक आश्चर्यचकीत झालेच पण पशूतज्ज्ञही हैराण झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, बकरी 6 महिन्यांनी पिल्लाला जन्म देते आणि कुत्रा 3 महिन्यांनी.
हे वाचा - आश्चर्य! चक्क माणसांसारखं बोलतोय श्वान; विश्वास बसत नाही तर पाहा हा Talking Dog Video
ही घटना दूरदूरपर्यंत पसरली. या अनोख्या पिल्लाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते आहे. आता या बकरीसारख्या दिसणाऱ्या श्वानाचं करायचं तरी काय, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
बिहारमधील श्वानाने बकरीसारख्या दिसणाऱ्या पिल्लाला दिला जन्म. pic.twitter.com/1zkRiR4liu
— News18Lokmat (@News18lokmat) November 3, 2022
सध्या त्याला लोक दूध देत आहेत. पण लवकरच वनविभागाला सुपूर्द करणार असल्याचं ते म्हणाले. जेणेकरून त्याची तपासणी करून हे शक्य कसं आहे, याची माहिती मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Dog, Goat, Pet animal, Viral, Viral videos