मुंबई, 29 ऑक्टोबर : कुत्र्याच्या हल्ल्याच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. हल्ल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात एका कुत्र्याने एका मुलावर भयंकर हल्ला केला आहे. कुत्र्याने मुलाचा पाय जबड्यात धरला. त्याला सोडवण्यासाठी लोकांनीही चारही बाजूंनी त्या कुत्र्यावर वार केले. पण कुत्र्याने मुलाला जबड्यातून सोडलं नाही. व्हिडीओत पाहू शकता एक मुलगा सायकलवरून येतो. तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेला एक कुत्रा आहे. कुत्रा मुलाच्या पायाला चावतो आणि त्याचा पाय जबड्यात धरून ठेवतो. तिथल्या घरातील एक महिला बाहेर येते ती त्या कुत्र्याला घाबरवून हाकलवण्याचा प्रयत्न करते, त्याला लाथेने मारते पण कुत्रा काही हटत नाही. त्यानंतर दुसरी एक व्यक्ती येते तीसुद्धा तिला मारते पण तरी कुत्रा त्या मुलाचा पाय सोडत नाही. यानंतर ती महिला घरातून चप्पल आणते आणि सटासट त्या कुत्र्यावर मारते पण तरी कुत्रा बाजूला हटत नाही. शेवटी कुणी काठी, कुणी झाडू, कुणी चपला घेऊन त्या कुत्र्यावर चारही बाजूंनी वार करतात. त्यानंतरही कुत्रा त्या मुलाचा पाय आपल्या जबड्यातून सोडताना दिसत नाही. त्या मुलाला खेचून घऱात नेलं जातं. तेव्हासुद्धा कुत्रा हटत नाही.
@gharkekalesh ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ पंजाबमधील आहे. हे वाचा - फेव्हरेट मिठाईऐवजी कचोरी दिल्याने चवताळली गौरी हत्तीण; दुकानदाराला आधी सोंडेने आपटलं नंतर… व्हिडीओच्या शेवटपर्यंत कुत्र्याने मुलाला सोडल्याचं दिसत नाही. याच्यापुढे त्या मुलांचं काय झालं ते माहिती नाही. पण हा व्हिडीओ भयानक आहे.
Dog attack kid pic.twitter.com/vWCZpwfGmM
— ताइहुंग (@Taehyungsupe) October 26, 2022
कुत्रा चावल्यानंतर लगेच काय करायचं? कुत्रा चावल्याने देखील गंभीर आजार होऊ शकतात. कुत्रा चावल्यानंतर निष्काळजीपणा अजिबात करू नये. प्रथमोपचारानंतर लोकांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत. डॉ. हरवतार सिंग सांगतात की, ज्या ठिकाणी कुत्रा चावला आहे, ती जागा सतत साबण आणि पाण्याने 10 मिनिटे धुतली पाहिजे. कुत्र्याच्या लाळेतून बाहेर पडणारा लसा विषाणू साबणातील रासायनिक घटकांमुळे नाहीसा होतो. यानंतर, तुम्ही जखमेवर अँटी-बॅक्टेरियल किंवा इतर कोणतीही जखम भरणारी क्रीम लावू शकता. जास्त रक्तस्त्राव होत असल्यास किंवा जखम जास्त असल्यास अशा स्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे वाचा - तोंडात बॉम्ब फुटल्याने गाय गंभीर जखमी; दोषींवर कारवाई करण्याची लोकांची मागणी याशिवाय, रेबीजविरोधी लस (एआरव्ही) 24 तासांच्या आत दिली पाहिजे. जर तुम्हाला रेबीजची लागण झालेल्या कुत्र्याने चावा घेतला असेल, तर विलंब न करता काही तासांतच योग्य उपचार सुरू करावेत. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मते, लोकांना कुत्रा चावल्यानंतर 24 तासांच्या आत रेबीज प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मिळावा. स्थिती गंभीर असल्यास, काहीवेळा डॉक्टर लस दिल्यानंतर अँटी-रेबीज सीरम देखील लावतात. लसीचा दुसरा डोस तिसऱ्या दिवशी, तिसरा डोस सातव्या दिवशी, चौथा डोस 14 व्या दिवशी आणि पाचवा डोस 28 व्या दिवशी दिला जातो. एकूण 5 डोस लागू केले जातात.