मुंबई, 17 ऑक्टोबर : पाळीव प्राण्यांना माणसांची भाषा समजते हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे प्राण्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यानंतर माणसांना नेमकं काय सांगायचं आहे हे ते ओळखतात आणि तसे वागतात. माणसांच्या वागण्यावर ते प्रतिक्रियाही देतात. पण कधी माणसांसारखं या प्राण्यांना बोलताना तुम्ही पाहिलं आहे का? माणसांसारख्या बोलणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. श्वानांचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. काही श्वान तर माणसांसारखी घरातील कामं करताना, घरकामात आपल्या मालकाची मदतही करताना दिसतात. पण प्राण्यांची एक वेगळी भाषा असते. ते व्यक्त होण्यासाठी त्यांच्या काही हालचाली करतात. ओरडून किंवा कान, शेपटी असे अवयव हलवून, त्यातून माणसांना जे काही सांगायाचं ते सांगतात. त्यांच्या नेहमी संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना त्यांची ही शारीरिक हालचालींची भाषा समजते. हे वाचा - ऐकावं ते नवलचं! कुत्र्यांच्याही डोळ्यात येतात आनंद अश्रू; हे आहे कारण पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील श्वान मात्र आपल्या मालकासारखाच बोलतोही आहे. कुत्रा आणि माणसांसारखं बोलणं शक्यच नाही, असंच तुम्ही म्हणाल. पण हे खरं आहे. तुम्हाला विश्वास बसत नाही तर व्हिडीओच पाहा.
व्हिडीओत पाहू शकता एक तरुणी दिसते आहे, तिच्यासोबत एक डॉग आहे. तरुणी बिल्डिंगखाली उभी राहून कुणालातरी आवाज देते आहे. हॅलो, हॅलो असं ओरडून हाका मारते आहे. जशी तरुणी हॅलो म्हणते तसं तिचा पेट डॉगही हॅलो बोलतो. जितक्या वेळा मालकीण आवाज देते, तितक्या वेळा तोसुद्धा आवाज देतो. त्याने उच्चारलेला हॅलो हा शब्द स्पष्टपणे ऐकू येतो. ती तरुणीसुद्धा हसू लागते. तिलासुद्धा आपल्या श्वानाचं कौतुक वाटतं. हे वाचा - Shocking! हवेत फुटबॉलसारखं उडवून उडवून घेतला जीव; म्हशींनी सिंहाला दिलेल्या भयानक मृत्यूचा VIDEO @buitengebieden ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंटही येत आहेत. एका युझरने तर 2050 सालापर्यंत हा पूर्णपणे बोलायला शिकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर एकाने श्वान गाणंही गातात असं म्हटलं आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून किंवा श्वानाच्या बोलण्याबाबत काय वाटतं किंवा तुमच्या पाहण्यात असा बोलणारा कुत्रा असेल तर त्याबाबतचा अनुभवही आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.