Home /News /viral /

मालकासाठी काहीही! चक्क कार चालवताना दिसला श्वान; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास

मालकासाठी काहीही! चक्क कार चालवताना दिसला श्वान; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास

एक कुत्रा चक्क ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ (Dog Drives Car) सध्या व्हायरल होत आहे. यात श्वानाला कार चालवताना पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

    नवी दिल्ली 11 मे : पाळीव प्राण्यांमध्ये (Pet Animals) लोकांना सर्वात जास्त आवडणारा प्राणी म्हणजे कुत्रा. त्याचा समजूतदारपणा, निष्ठा आणि बुद्धिमत्तेमुळे तो इतर प्राण्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. श्वानांना ज्या गोष्टी शिकवल्या जातात, त्या ते अगदी पटकन आणि सहज शिकतात. असाच एक कुत्रा चक्क ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ (Dog Drives Car) सध्या व्हायरल होत आहे. यात श्वानाला कार चालवताना पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. OMG! चक्क माकडांनी सुसाट पळवली Bike; Rider Monkeys चा Video पाहून थक्क व्हाल हा व्हिडिओ (Dog Driving Video) ऑस्ट्रेलियातील आहे. यात लेक्सी नावाचा जॅक रसेल कुत्रा गाडी चालवताना दिसत आहे. एका छोट्या लॉरी फार्ममध्ये श्वान गाडी चालवताना दिसत आहे. मेट्रो यूकेच्या म्हणण्यानुसार, श्वानाचा मालक कॅमेरॉन शेक याने स्वतः त्याच्या श्वानाला गाडी चालवायला शिकवली होती आणि त्याने त्याचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओही शूट केला आहे. कॅमेरॉनच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो लेक्सीला मेंढीच्या फार्ममध्ये घेऊन जात होता तेव्हा त्याने त्याला गाडी चालवायला शिकवली. तो ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियाच्या हॅमिल्टन जिल्ह्यात राहतो. कॅमेरॉनच्या म्हणण्यानुसार, लेक्सीला गाडी चालवायला शिकवण्याचा त्याचा कोणताही हेतू नव्हता. त्याला वाटले की आपल्या श्वानाला ड्रायव्हिंग शिकवता येऊ शकते, म्हणून त्याने श्वानाला कार चालवायला शिकवली. कॅमेरॉनने श्वानाला त्याच पद्धतीने गाडी शिकवली, जशी त्याच्या वडिलांनी त्याला शिकवली होती आणि श्वानानेही हे करून दाखवलं. भरधाव कारच्या धडकेत ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे आणि ड्रायव्हर...; अपघाताचा धडकी भरवणारा VIDEO लेक्सीने जेव्हा ड्रायव्हिंग शिकलं तेव्हा तो लहान पिल्लू होता आणि त्याला दुखापत झाली होती. आपल्या रस्त्यात येणाऱ्या मेंढ्यांना तो हटवू शकत नव्हता. जेव्हा लेक्सी बरा झाला तेव्हा तो थोडा हुशार झाला होता. दरम्यान, लेक्सीला कारमध्ये बसून अगदी सहज मेंढ्याना आपल्या रस्त्यातून बाजूला करता येईल आणि सुरक्षित राहता येईल, असं मालकाला वाटलं. आता लेक्सी मालकाची मदत करतो. तो अनेक गोष्टी वाहून नेण्यासाठी मालकाची मदत करतो आणि कॅमेरॉन याला चांगलं टीमवर्क म्हणतात. कॅमेरॉन आणि लेक्सीचं नातं इतकं घट्ट आहे की त्यांना एकमेकांचं म्हणणंही समजतं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dog, Viral videos

    पुढील बातम्या