Home /News /viral /

OMG! चक्क माकडांनी सुसाट पळवली Bike; Rider Monkeys चा Video पाहून थक्क व्हाल

OMG! चक्क माकडांनी सुसाट पळवली Bike; Rider Monkeys चा Video पाहून थक्क व्हाल

बाईक चालवणाऱ्या माकडांचा हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत.

  मुंबई, 10 मे :  माकड माणसांची हुबेहूब नक्कल करण्यात हुशार आहे हे तुम्हाला माहितीच आहे (Monkey video viral). माकडांची मस्ती, खट्याळपणा तुम्ही पाहिला असेल. सोशल मीडियावर माकडांचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. ज्यात चक्क माकड बाईक चालवताना दिसले आहेत. व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत (Monkeys riding bike). बाईक चालवणं तसं सोपं नाही. कित्येक वेळा सायकल शिकताना, चालवतानाच बरेच लोक पडतात. असं असताना बाईकवर बॅलेन्स सांभाळणं म्हणजे मुश्किल. पण या माकडांनी मात्र ते करून दाखवलं. खरंतर माकडांनी बाईक रेसच लावली आहे. या रायडर माकडांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल. व्हिडीओत पाहू शकता दोन माकडं छोट्या बाईकवर बसले आहेत. त्या दोघांमध्ये रेस लागली आहे. त्यामुळे एकमेकांच्या पुढे जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. जे या मंकी रायडर्सची रेस पाहत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Panda (@dailygameofficial)

  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही जणांना का व्हिडीओ आवडला आहे. तर काहींनी यावर टीका केली आहे. हा एखाद्या पार्कातील व्हिडीओ वाटतो आहे आणि या माकडांना असं ड्रायव्हिंग करायला लावून त्यांचा माणसांच्या मनोरंजनासाठी वापरला जात असल्याचा आरोप काही युझर्सनी केला आहे. हे वाचा - बापरे बाप! शेतात घुसला तब्बल 13 फूट King Cobra; हातानेच पकडला आणि... याआधी सायकलिंग करणाऱ्या माकडांचाही व्हिडीओ समोर आला होता. ज्यात एक माकड सायकल चालवतं आहे आणि दुसरं माकड त्याच्यामागे बसलं आहे.
  व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की माकड कशाप्रकारे सायकल चालवत आहे. व्हिडिओ पाहून वाटतं की ते या कामात एक्सपर्ट आहे. कारण सायकल चालवायला शिकताना लहान मुलांनाही भरपूर कष्ट घ्यावे लागतात. आता या माकडाला हे शिकण्यासाठी किती वेळ लागला, याची माहिती नाही. मात्र ते अगदी आरामात सायकल चालवत आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुमचंही मन जिंकेल. हे वाचा - म्हणे, 'लल्ला, रसगुल्ला...', मुलींना वैतागलेल्या मुलांची मुख्याध्यापकांकडे तक्रार; Funny Letter Viral सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा मजेशीर व्हिडिओ earthlocus नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला होता.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wild animal

  पुढील बातम्या