नवी दिल्ली, 06 एप्रिल : रस्त्यावर, एखाद्या घरात किंवा कॉलनीत घुसून बिबट्याने श्वानाला पळवलं, बिबट्याने श्वानाची शिकार केली असे एक ना दोन कितीतरी प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या समोर श्वान दिसताच त्याला सोडत नाही, तर संधी बघून आपला डाव साधतो आणि शिकार करतो. एकंदर काय तर बिबट्या श्वानाची शिकार करतो. पण कधी श्वाना ला वाचवणाऱ्या बिबट्या ला तुम्ही पाहिलं आहे का? असाच या प्राण्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. श्वान आणि बिबट्याच्या या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्या श्वानाची शिकार करायला बिबट्या आला, त्याच श्वानाचा त्या बिबट्याने जीव वाचवला आहे. आता असं घडलं तरी काय, हे जाणून घेण्याची उत्सुकताही तुम्हाला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता पाण्यात बिबट्या आणि श्वान दिसत आहे. बिबट्या अगदी शांत आहे आणि श्वान त्याच्या पाठीवर चढण्याचा प्रयत्न करत आहे.
शिकार इतक्या जवळ असूनही शिकारी त्याला काहीच करत नाही आहे. उलट त्याच्याच चेहऱ्यावर एक वेगळी भीती दिसत आहे. Snake in plane : बापरे! उडत्या विमानात साप, पाहून पायलटला फुटला घाम; जीव वाचवण्यासाठी घाईघाईत… तुम्ही व्हिडीओ नीट पाहिला तर श्वान आणि बिबट्या एका ठिकाणी अडकले आहेत. श्वानाची शिकार करायला आलेला बिबट्याही श्वानासह तिथं फसला. आता शिकार आणि शिकारी दोघांचाही जीव एकत्र धोक्यात होता. दोघांचीही एकत्र जीवनमृत्यूशी झुंज सुरू होते. त्यामुळे दोघांनीही ही झुंज एकत्र दिली, दोघंही एकमेकांना आधार देताना, एकमेकांचा दी वाचवताना दिसत आहेत. बिबट्या श्वानावर हल्ला करत नाही कारण त्याचं हे पाऊल दोघांसाठीही धोकादायक ठरू शकतं, याची कल्पना त्याला आहे. त्यामुळे एका पाइपच्या आधारे तो शांत तसाच राहिला आहे तर श्वान त्याच्यावर चढून पाण्यात बुडण्यापासून स्वतःला वाचवतो आहे. वाघ-सिंहाचं भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला श्वान; फायटिंगचा शेवट VIDEO मध्येच पाहा आयएफएस अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. बिबट्या आणि श्वाना एकत्र जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. ही प्रकृतीमध्ये जिवंत राहण्याची प्रवृत्ती दाखवते, असं कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे.
A leopard and dog struggling for life together, It’s all about the instinct for survival in nature. 🐆 🐕
— Surender Mehra IFS (@surenmehra) April 6, 2023
Animals safely came out ..#Survival #nature #wildlife
VC: SM@susantananda3 @supriyasahuias @ipskabra @SudhaRamenIFS @ParveenKaswan pic.twitter.com/S20yeLOyAy
दोन्ही प्राणी सुरक्षितरित्या बाहेर आल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे.