जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Snake in plane : बापरे! उडत्या विमानात साप, पाहून पायलटला फुटला घाम; जीव वाचवण्यासाठी घाईघाईत...

Snake in plane : बापरे! उडत्या विमानात साप, पाहून पायलटला फुटला घाम; जीव वाचवण्यासाठी घाईघाईत...

विमानात साप (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

विमानात साप (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य-Canva)

विमानात पायलटजवळ साप पोहोचताच एकच खळबळ उडाली.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

केपटाऊन, 06 एप्रिल :  साप म्हटलं तरी सर्वांना दरदरून घाम फुटतो. जमिनीवर असा साप दिसला तर किमान जीव वाचवण्यासाठी पळता तरी येतं. पण विचार करा असा साप जमिनीपासून हजारो फूट उंच आकाशात गेल्यावर दिसला तर… अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विमाना त एक साप दिसला. धक्कादायक म्हणजे हा साप प्लेनच्या कॉकपिटमध्ये होता, जिथं पायलट बसतो. सापाला पाहताच पायलटला घाम फुटला आणि त्यानंतर असं घडलं की… दक्षिण आफ्रिकेतील ही घटना आहे. ब्लूमफॉन्टेनहून प्रिटोरियाला हे विमान जात होतं. हे प्रायव्हेट प्लेन होतं. रुडॉल्फ इरास्मस नावाचा पायलट हे विमान उडवत होतं. विमान विमान हजारो फूट उंचावर होतं, तेव्हा विमानात साप असल्याचं पायलटला. हा साप कॉकपिटमध्येच होता. सापाला पाहून पायलटला घाम फुटला. रुडॉल्फने सांगितल्यानुसार, त्याला पाठीवर अचानक काहीतरी थंड लागल्यासारखं वाटलं. त्यानंतर त्याला त्याच्या खुर्चीखाली काहीतरी हलत असल्याचं जाणवलं. त्याने खुर्चीखाली पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण तिथं साप होता.

News18लोकमत
News18लोकमत

तसं विमानात साप दिसल्याच्या काही घटना याआधीही घडल्या आहेत. पण हे साप प्रवाशी ज्या भागात असतात तिथं सापडले होते. पण हा साप तर पायलटच्या जवळ होता. ज्यामुळे फक्त त्याच्याच नव्हे तर त्याच्यासह त्याच्या हातात असलेल्या प्रवाशांच्या जीवही धोक्यात आला होता. अखेर पायलटने मोठा निर्णय घेतला. सर्पदंश झालेल्या आईला वाचवण्यासाठी लेकीची धडपड; फिल्ममध्ये पाहिलं तसं सापाचं विष तोंडाने काढलं, शेवटी… रूडॉल्फने प्रवाशांचा विचार करून कसंबसं स्वतःला सांभाळलं आणि  एमर्जन्सी लँडिंग करण्याचं ठरवलं. त्याने प्रवाशांना आपल्या खुर्चीखाली साप आहे आणि आपण एमर्जन्सी लँडिंग करत आहोत, अशी सूचना दिली. प्रवाशांकडून काहीच आवाज आला नाही. ते घाबरले असल्यचं त्याला समजलं. वेल्कॉम शहरात विमानाचं इमर्जन्सी लँडिंग झालं. वॉर्सेस्टर फ्लाइंग क्लबमधून विमानाने उड्डाण केले. तेथे उपस्थित असलेल्या दोन लॉन्सने सांगितले की, त्यांना विमानाजवळ साप दिसला होता, ते त्याला काढण्याचा प्रयत्न करत होते पण तो विमानाच्या तळाशी गेला होता. विमान उडवण्यापूर्वी पायलटने साप तपासला होता, पण नंतर तो दिसला नाही, म्हणून त्याने विमान सुरक्षित मानले आणि प्रवास सुरू केला. 2 वर्षीय चिमुकल्याने आधी विषारी सापाला पळव पळव पळवलं, नंतर…; दृश्य पाहून कुटुंब हादरलं तपासणी केल्यानंतर तो केप कोब्रा असल्याचं समजलं. जो चावला तर फक्त 30 मिनिटांत संबंधित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. पण परिस्थितीचं भान राखत रूडॉल्फने सापापासून स्वतःसह प्रवाशांचाही जीव वाचवला. त्यामुळे त्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात