नवी दिल्ली 07 डिसेंबर : पृथ्वीवर विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत. यांचं जगही काही प्रमाणात माणसांसारखंच असतं. माणूस ज्याप्रकारे एकमेकांसोबत मजा-मस्करी करतो तसंच हे प्राणीदेखील करतात. मात्र, प्राण्यांमध्ये हे खूपच कमी प्रमाणात पाहायला मिळतं की एखादा जीव दुसऱ्या प्राणी किंवा पक्षासोबत मस्ती करत आहे. सध्या असाच एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ मांजर आणि कोंबडीचा (Funny Video of Cat and Chicken) आहे. जो तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की एक छोटी पाळीव मांजर शांततेत बसलेली आहे आणि तिच्यासमोरच एक कोंबडी आहे. ही कोंबडी मांजरीला त्रास देत आहे. कोंबडी आधी आपल्या चोचीने मांजरीच्या डोक्यात मारते. मात्र मांजर काहीही रिअॅक्ट करत नाही आणि याकडे दुर्लक्ष करते. हे पाहून कोंबडी पुन्हा एकदा मांजरीच्या जवळ येते आणि तिच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न करते. मात्र, कोंबडीचा हा डाव मांजर आधीच ओळखते आणि आपल्या पायाने कोंबडीलाच मारते. यानंतर कोंबडी मागे हटते आणि मांजर तिथून पळून जाते.
हेही वाचा - डोळ्याच्या पापण्या मिटण्याआधी तरुणीने स्टेजवर बदलले कपडे; VIDEO पाहून व्हाल अवाक
मांजर आणि कोंबडीचा हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर mdafzal_01 नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 7 मिलियन म्हणजेच 70 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर जवळपास दोन लाख जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर तुम्हाला प्राण्यांचे अनेक निरनिराळे व्हिडिओ पाहायला मिळतील. हे व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात आणि नेटकऱ्यांना खळखळून हसवतात. मांजर, कुत्रा आणि माकडाचे व्हिडिओ तर अनेकदा फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र यातील काहीच व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.