Home /News /lifestyle /

Shocking! टॉयलेट सीटवर बसताच गुप्तांगाला चावला भलामोठा अजगर आणि...

Shocking! टॉयलेट सीटवर बसताच गुप्तांगाला चावला भलामोठा अजगर आणि...

आपल्या दिवसाची सुरुवात इतकी भयानक असेल याचा स्वप्नातही या व्यक्तीने विचार केला नसेल.

    कॅनबेरा, 08 जुलै : दररोज नवा दिवस उजाडला की प्रत्येक जण एक नवीन स्वप्नं घेऊनच उठतो. आजचा दिवस आपला चांगला जावो अशीच आशा करतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगलीच व्हावी असंच प्रत्येकाला वाटतं. पण एका व्यक्तीसाठी एका नव्या दिवसाची सुरुवात एखाद्या रात्रीच्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हती. कारण या व्यक्तीच्या चक्क गुप्तांगालाच भल्यामोठ्या अजगराने चावा (Python) घेतला आहे. आपल्या दिवसाची सुरुवात इतकी भयानक असेल याचा स्वप्नातही या व्यक्तीने विचार केला नसेल. ही धक्कादायक घटना आहे ऑस्ट्रेलियाच्या ग्रेझ (Graz) शहरातील. 65 वर्षांची ही व्यक्ती सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास शौचाला गेली. ती टॉयलेट सीटवर बसली आणि काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. त्यांनी खाली वाकून पाहिलं तर तिथं दुसरं तिसरं काही नाही तर चक्क भलामोठा अजगर होता. हे वाचा - सावधान, पुढे धोका आहे! चक्क हायवेवर शतपावली करतायेत 5 सिंह; धडकी भरवणारा VIDEO जवळपास 1.6 मीटर म्हणजे 5 फुटांचा हा साप होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. इतक्या मोठ्या अजगराने या व्यक्तीच्या गुप्तांगाला चावा घेतला (Python bites man in toilet) होता. हा अजगर आशियाई अजगर होता. जो 9 मीटरपेक्षा जास्त लांबपर्यंत वाढतो. पोलिसांनी सांगितलं, या व्यक्तीने सांगितल्यानुसार तो शौचाला बसताच त्याला गुप्तांगाला कुणीतरी चिमटा काढल्यासारखं जाणवलं.  रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार हा अजगर या व्यक्तीच्या शेजारील घरातून टॉयलेट पाइपमार्फत आल्याची शक्यता वर्तवली जाते आहे . पण तरी तो कुठून आला हे अद्याप स्पष्ट नाही आहे. या व्यक्तीच्या शेजारील व्यक्तीकडे 11 साप आहे. ते सर्व बिनविषारी आहेत. हे वाचा - नवरदेवाला पाहताच उडाला नवरीच्या चेहऱ्याचा रंग; ढसाढसा रडली आणि...; पाहा VIDEO आपत्कालीन विभागाला बोलावून टॉयलेटमधून हा अजगर बाहेर काढण्यात आला आहे आणि त्याच्या मालकाकडे सोपवण्यात आलं आहे. तर ज्या व्यक्तीला साप चावला, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Australia, Python, Shocking news, Viral, Viral news

    पुढील बातम्या