Home /News /viral /

सावधान, पुढे धोका आहे! चक्क हायवेवर शतपावली करतायेत 5 सिंह; धडकी भरवणारा VIDEO

सावधान, पुढे धोका आहे! चक्क हायवेवर शतपावली करतायेत 5 सिंह; धडकी भरवणारा VIDEO

हायवेवर सिंहाचा (Lion) कळप फिरत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

    अहमदाबाद, 06 जुलै : मस्त गाणी ऐकत तुम्ही ड्रायव्हिंग करताय किंवा जेवल्यानंतर थोडा बाहेर फेरफटका मारत आहात आणि अचानक तुमच्यासमोर सिंह आला तर... कल्पना करूनच घाम फुटला ना. मग आता सावध राहा. कारण खरंच रस्त्यावर फक्त एक नाही तर चक्क पाच-पाच सिंह (5 Lions on highway) फिरताना दिसले आहेत. हायवेवर सिंहाचा (Lion) कळप फिरत असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हायवेवर फिरणाऱ्या सिंहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Lion viral video) व्हायरल होतो आहे. एकाच वेळी पाच सिंह रात्री अंधारात शतपावली करताना दिसले. @oldmumbai ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे आफ्रिका नाही, भारत आहे. गुजरातच्या पीपावाव पोर्टवर सिंहाचा कळप रस्त्यावर फिरताना दिसलं, असं या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - मृतावस्थेतील पक्ष्याला जागं करताना मित्राची धडपड, मन हेलावून टाकणारा VIDEO हा व्हिडीओ गुजरातच्या अमरेलीतील असल्याचा सांगितलं जातं आहे. अमरेली-राजुला हायवेवरील हे दृश्यं आहे. तिथं असलेल्या काही लोकांनी हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ कोणत्याही भयानक व्हिडीओपेक्षा कमी आहे नाही आहे. हे वाचा - OMG! मानवी वस्तीत घुसलेल्या हत्तीचा धुमाकूळ; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हिडीओत पाहू शकता सिंहाचं हे एक कुटुंब आहे. ज्यात सिंहिणी आणि तिचे बछडे दिसत आहेत. अगदी छानपणे जणू जंगलातून बाहेर पडून हे सिंह रस्त्यावरील हवेचा आनंद घेत आहेत, असंच दिसतं आहे..
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या