मुंबई, 02 ऑगस्ट : बैल, रेडा, हत्ती अशा भल्यामोठे प्राणी संतप्त (Angry aninmal) झाले आणि त्यांच्यासमोर कुणी आलं तर त्याचं काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. अशाच एका रेड्याचा (Angry bull) व्हिडीओ (Angry bull video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. चवताळलेल्या या रेड्याला (Angry bull on road) पाहताच तुम्हाला घाम फुटेल, हृदयाची धडधड वाढेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तर मात्र तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल (Angry bull hit car).
काही देशात विशेषतः स्पेनमध्ये अशा चवताळलेल्या रेड्यांचा खेळ असतो. ज्यात संतप्त रेडा (Angry bull) रस्त्यावर सोडला जातो आणि त्याच्यासमोर लोकाना पळवलं जातं. रनिंग ऑफ द बुल्स असं या खतरनाक खेळाचं नाव आहे. अशाच खेळाचा हा व्हिडीओ आहे.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता एक रेडा रस्त्यावरून पळत येत आहे. तो संतप्त झालेला आहे. त्याच्यासमोर जो कुणी येईल त्याचं काही खरंच नाही. त्यामुळे आजूबाजूला इतकी माणसं असूनही त्या रेड्यासमोर येण्याची हिंमत कुणी करत नाही आहे.
हे वाचा - रस्त्यावर धावत सुटला चिमुकला, वेगाने कार आली आणि...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
आपल्या तावडीत कोणच सापडत नाही आङे हे रेड्याला दिसलं. मग पुढे रस्त्यातच त्याला एक कार दिसली. त्याने ती कारच शिंगावर घेतली. कारच्या पुढील एका चाकात आपली शिंगे टाकून रेडा कार उचलण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर एकाच शिंगावर तो कार उचलतोसुद्धा. रेड्याने गाडीची काय अवस्था केली आहे तुम्ही पाहू शकता. गाडीच्या पुढील एका बाजूचा भाग पूर्ण खिळखिळा झाला आहे. पुढील एक टायरही फुटला आहे.
हे वाचा - अंडरविअर घालून मासे पकडताना प्रायव्हेट पार्टला लटकला खेकडा आणि... Shocking video
धक्कादायक म्हणजे जेव्हा रेडा ही कार आपल्या शिंगावर धरतो तेव्हा कारमध्ये प्रवासीही बसलेले आहेत. त्या प्रवाशांवर हल्ला करता येत नाही आहे. म्हणून रेड्याने आपला राग गाडीवरच काढला. सुदैवाने गाडीतून कुणीही बाहेर पडलं नाही आणि या रेड्याच्या तावडीत सापडलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bull attack, Other animal, Shocking viral video, Viral, Viral videos