मुंबई, 03 ऑगस्ट : प्रत्येक प्राणी (Animal) आणि पक्ष्याचा (Bird) आवाज हा वेगवेगळा असतो. त्यांचा आवाजसुद्धा त्यांची ओळख असते. माणस या प्राणी-पक्ष्यांच्या (Animal video) आवाजाची नक्कल करू शकतात. पण कोणत्या पक्ष्याला (Bird video) किंवा प्राण्याला एकमेकांच्या आवाजाची नकल करताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर (Social media) अशा एका पक्ष्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. जो चक्क कुत्र्यासारखा भुंकू शकतो (Bird barking like a dog).
कुत्र्याचा आवाज काढणाऱ्या या पक्ष्याने सर्वांना हैराण केलं आहे (Shocking video). व्हिडीओत त्या पक्ष्याचा आवाज स्वतः ऐकूनही आपला आपल्या कानावर विश्वास बसत नाही. हे कसं काय शक्य आहे, असंच तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल.
व्हिडीओत पाहू शकता एक पक्षी बसलेला आहे. तो सुरुवातीला ओरडताना दिसतो. सुरुवातीला तो ज्या आवाजात ओरडतो तो सामान्य वाटतो. म्हणजे तो त्याचाच असावा. पण अचानक मध्येच तो कुत्र्यासारखा आवाज काढू लागतो. कुत्रे जसे भू भू करून भुंकतात तसाच हा पक्षीसुद्धा भुंकताना दिसतो.
हे वाचा - लय भारी! नटूनथटून लेहंग्यावरच नवरीने आधी मारल्या पुशअप्स; पाहा VIDEO
हा पक्षी म्हणजे सीगल आहे. जो कुत्र्याच्या आवाजाची नकल करतो आहे. जेव्हा हा पक्षी ओरडत असतो तेव्हा त्याच्या कानावर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज पडतो आणि तो त्या आवाजाची नकल करू लागतो. हा पक्षी जास्त करून समुद्रकिनारी दिसतो. तो खूप हुशार आणि जिज्ञासू असल्याचं सांगितलं जातं.
हे वाचा - आजी अन् नातवानं धरला गाण्यावर ठेका; व्हायरल होतोय भन्नाट डान्स VIDEO
मीडिया स्ट्रिमर यूट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पक्ष्याचं हे अनोखं कौशल्य पाहून सर्वांनाच कौतुक वाटतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking viral video, Viral, Viral videos