मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दिसताच क्षणी कुत्र्याने तोंडात धरला खतरनाक साप; असा भयानक शेवट की तुम्ही विचारही केला नसेल

दिसताच क्षणी कुत्र्याने तोंडात धरला खतरनाक साप; असा भयानक शेवट की तुम्ही विचारही केला नसेल

कुत्रा आणि सापाचा व्हिडीओ व्हायरल.

कुत्रा आणि सापाचा व्हिडीओ व्हायरल.

कुत्रा आणि सापाचा हा धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 23 नोव्हेंबर : साप फक्त माणूसच नव्हे तर प्राण्यांसाठीही जीवघेणा ठरू शकतो. त्याच्या दंशाने प्राण्यांचाही मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे सापाच्या क्षमतेची माहिती असलेले प्राणी सापाशी पंगा घेत नाहीत. पण एका श्वानाने मात्र सापाशी पंगा घेतला. साप दिसताच त्याला आपल्या जबड्यात धरलं आणि त्यानंतर जे घडलं ते भयंकर आहे. असं काही घडेल याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल.

कुत्रा आणि सापाचा हा धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती गाडीखाली काठी टाकून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्या व्यक्तीजवळ एक कुत्राही दिसतो आहे. काही वेळातच त्या गाडीच्या खालून एक साप खाली पडतो. त्यावेळी कुत्रा गाडीच्या खालीच असतो. जसा साप पडतो तसा क्षणाचाही विलंब न करता कुत्रा त्याच्यावर तुटून पडतो. सापाला आपल्या जबड्यात धरतो.

हे वाचा - बापरे बाप! सर्पदंश झालेली व्यक्ती रुग्णालयात येताच सर्वांना फुटला घाम; उपचाराऐवजी सुरू झाली पळापळ

आता कुत्र्याने सापाला जबड्यात धरलं म्हणजे आता या कुत्र्याचं खरं नाही असंच तुम्हाला वाटेल. पण प्रत्यक्षात मात्र उलटच घडतं. कुत्रा त्या सापाला जबड्यात धरून खेचत घेऊन जातो आणि त्याला आपटत राहतो. जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत तो आपटत राहतो पण आपल्या तोंडातून काही सोडत नाही.

हा जॅक रसल प्रजातीचा श्वान आहे. ज्याची सापाशीही लढण्याची क्षमता असते. ज्या विषारी सापांनाही हा श्वान घाबरत नाही. आता याच व्हिडीओत पाहा, मालकाच्या गाडीच्या इंजिनमध्ये अडकलेल्या सापाला या श्वानाने खेचून बाहेर काढलं आणि त्याचा जीव घेतल्यानंतरच तो शांत बसला.

View this post on Instagram

A post shared by AF Ranch (@a.f.ranch)

a.f.ranch इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या श्वानाच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे.

हे वाचा - मुलगी तिच्या प्रियकरासोबत श्वान बनून राहते; विचित्र लव्हस्टोरी बघून तुम्हाला वाटेल आश्चर्य

तुमची या व्हिडीओवर काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

First published:

Tags: Dog, Pet animal, Snake, Viral, Viral videos, Wild animal