जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बापरे बाप! सर्पदंश झालेली व्यक्ती रुग्णालयात येताच सर्वांना फुटला घाम; उपचाराऐवजी सुरू झाली पळापळ

बापरे बाप! सर्पदंश झालेली व्यक्ती रुग्णालयात येताच सर्वांना फुटला घाम; उपचाराऐवजी सुरू झाली पळापळ

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

साप चावलेली ही व्यक्ती उपचारासाठी रुग्णालयात आल्यानंतर सर्वजण जीव मुठीत धरून राहिले.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 22 नोव्हेंबर :  साप चावल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. सर्पदंश झाल्यानंतर तात्काळ रुग्णालयात जावं असं सांगितलं जातं. एक व्यक्तीही साप चावल्यानंतर अशीच लगेच रुग्णालयात गेली. पण सर्पदंश झालेली ही व्यक्ती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आल्यानंतर सर्वांना घाम फुटला. त्या व्यक्तीवर उपचार करण्याऐवजी रुग्णालयात सर्वांची पळापळ सुरू झाली. सर्वजण जीव मुठीत धरून राहिले.  उत्तर प्रदेशच्या जालौनमधील हे प्रकरण आहे. मिर्झापूर गावात राहणारी ही व्यक्ती. साप चावल्यानंतर ती उपचार करण्यासाठी म्हणून जालौनच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात आली. मला साप चावला आहे माझ्यावर उपचार करा, असं त्याने रुग्णालयात सांगितलं. पण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी मात्र त्याच्यावर उपचार करण्याचं सोडून तिथून पळ काढला. हे वाचा -  OMG! सूर्यावर दिसला चक्क फिरता साप: VIDEO पाहून शास्त्रज्ञही झाले हैराण सर्पदंश झालेली ही व्यक्ती उपचारासाठी येताच रुग्णालयातील कर्मचारी घाबरले. याचं कारण म्हणजे ती व्यक्ती एकटीच रुग्णालयात आली नव्हती. तर ज्या सापाने तिला दंश केला त्या सापालाही ती सोबत घेऊन आली होती. एका पिशवीत त्या व्यक्तीने सापाला भरलं आणि आपल्यासोबत रुग्णालयात नेलं. कोणता साप चावला याची माहिती झाली तर संबंधित व्यक्तीवर उपचार करणं शक्य होतं. म्हणूनच ही व्यक्ती त्या सापाला आपल्यासोबत घेऊन रुग्णालयात गेली. जसा साप चावला तसं या व्यक्तीने त्याच्या मानेला धरलं आणि पिशवीत कोंबून रुग्णालयात आणलं. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आपल्याला कोणता साप चावला हे दाखवण्यासाठी त्या व्यक्तीने पिशवी उघडली आणि जे दिसलं ते पाहून सर्वजण घाबरले. कारण तो साधासुधा साप नव्हे तर महाकाय अजगर होता. रुग्णालय प्रशासनाने याची माहिती वनविभागाला दिली आणि त्याला जंगलात सोडण्यात आलं. तर त्या व्यक्तीला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं. हे वाचा -  बापरे! झोपेत महिलेच्या तोंडात घुसला साप आणि…; आजवर कधीच पाहिला नसेल इतका भयानक VIDEO

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार सार्वजनिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सांगितलं की, ही व्यक्ती घरात होती, तेव्हा तिला साप चावला. उपचारासाठी ती रुग्णालयात आली. पण काही लक्षणं नव्हती. त्याला औषधं देऊन जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात