मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मुलगी तिच्या प्रियकरासोबत श्वान बनून राहते; विचित्र लव्हस्टोरी बघून तुम्हाला वाटेल आश्चर्य

मुलगी तिच्या प्रियकरासोबत श्वान बनून राहते; विचित्र लव्हस्टोरी बघून तुम्हाला वाटेल आश्चर्य

Viral video

Viral video

एक जोडपं असं आहे जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या जोडप्याला प्राण्यांच्या रुपात एकमेकांच्या सहवासात रहायला आवडतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 नोव्हेंबर : एकमेकांच्या प्रेमात असलेल्या व्यक्ती एकमेकांसाठी काहीही करू शकतात, असं म्हटलं जातं. काहींना आपल्या प्रेमासाठी मृत्यूला कवटाळल्याचीही काही उदाहरणं इतिहासामध्ये आढळतात. शाहजानसारख्या प्रियकरानं पत्नीप्रेमापोटी ताजमहालासारख्या भव्य कलाकृतीची निर्मिती केली. थोडक्यात काय तर, प्रेमात असलेली व्यक्ती आपल्याला कल्पना करता येणार नाही, अशा गोष्टी करू शकते. मुली आपल्या प्रियकरामध्ये स्वप्नातील राजकुमार शोधत असतात तर प्रियकर आपल्या प्रेयसीमध्ये राजकुमारी शोधतो. पण, एक जोडपं असं आहे जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या जोडप्याला प्राण्यांच्या रुपात एकमेकांच्या सहवासात रहायला आवडतं. जेना आणि लॉरेंझो असं या जोडप्याचं नाव आहे. यातील जेना पाळीव श्वानाप्रमाणे लॉरेंझोच्या सहवासात राहते. तो तिला गळ्यात पट्टा अडकवून श्वानाप्रमाणे सर्वत्र फिरवतो आणि श्वानाच्याच भांड्यात जेवण देतो. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

युट्युबवरील 'लव्ह डोन्ट जज' या कार्यक्रमात जेनाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 21वर्षीय जेनाला तिच्या प्रियकरासोबत एखाद्या श्वानासारखं रहायला आवडतं. ती श्वानासारखीच खाते-पिते आणि फिरते. या विचित्र छंदाने लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. जेना पलंगावर नव्हे तर पिंजऱ्यात झोपते. तिला इतर मुलींप्रमाणे आपल्या प्रियकराच्या हातात हात घालून फिरायला आवडत नाही. तिचा प्रियकर लॉरेंझो एखाद्या श्वानाप्रमाणेच तिच्या गळ्यात पट्टा अडकवून तिला फिरायला नेतो. तो श्वानाच्या मालकाप्रमाणे चालतो आणि ती गुडघ्यावर बसून जीभ हलवत चालते.

हेही वाचा - VIDEO - बंद लिफ्टमध्ये तरुण काढत होता छेड; एकट्या तरुणीने तिथंच केला त्याचा 'गेम'

जेनाला अशा आयुष्याची इतकी सवय झाली आहे की जर तिच्या गळ्यात श्वानाचा पट्टा नसेल तर तिला कमालीचं असुरक्षित वाटू लागतं. आश्चर्याची बाब म्हणजे यात तिच्या प्रियकराचा कोणताही दोष नाही. कारण, जेनाने स्वतःच अशा जीवनाची इच्छा व्यक्त केली होती. जेना आणि लॉरेंझो आपल्या लव्ह स्टोरीला 'पपी प्ले' म्हणतात.

" isDesktop="true" id="790031" >

अशा विचित्र लव्ह स्टोरीमागील नेमकं कारण काय आहे? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. अतिशय सुंदर असलेल्या जेनाला श्वानासारखं आयुष्य का जगायचं आहे? याबद्दल बोलताना जेनानं सांगितलं की, लहानपणापासूनच तिला श्वानांची नक्कल करण्याची फार आवड होती. ती त्यांच्यासारखं दिसण्यासाठी खास ड्रेसही घालायची. आपल्या खऱ्या आयुष्यातही तिला तसंच राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे ती लॉरेंझोसोबत श्वानासारखी राहते. या जोडप्याकडे लोक अतिशय विचित्र नजरेने पाहतात आणि ट्रोलही करतात. पण, "कोणी काहीही म्हटलं तरी आपण आपलं आयुष्य बदलणार नाही," असं जेना म्हणते.

जेनाचा बॉयफ्रेंड लॉरेंझो म्हणाला की, जेव्हा त्याने पिंजरा पहिल्यांदा पाहिला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला होता. पण, त्याचं जेनावर प्रेम आहे आणि प्रेमासमोर तो हतबल झाला. जेना लॉरेंझोला आपला सर्वोत्कृष्ट 'बॉस' मानते. तो तिची खूप काळजी घेतो आणि तीदेखील त्याची 'लकी पपी' आहे.

First published:

Tags: Video viral