मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - भररस्त्यात चक्क रंगली शेळी आणि कुत्र्याची फाईट; लढाईत शेवटचा ट्विस्ट पाहून हसू आवरणार नाही

VIDEO - भररस्त्यात चक्क रंगली शेळी आणि कुत्र्याची फाईट; लढाईत शेवटचा ट्विस्ट पाहून हसू आवरणार नाही

शेळी आणि कुत्र्याचा लढाईचा असा शेवट झाला की ज्याचा विचारही आपण केला नसेल.

शेळी आणि कुत्र्याचा लढाईचा असा शेवट झाला की ज्याचा विचारही आपण केला नसेल.

शेळी आणि कुत्र्याचा लढाईचा असा शेवट झाला की ज्याचा विचारही आपण केला नसेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 13 डिसेंबर : फक्त माणसंच नव्हे तर प्राण्यांमध्येही लढाई (Animal fighting video) होत असते. प्राण्यांच्या फायटिंगचे असे बरेच व्हायरल व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये चक्क एक कुत्रा आणि एका शेळीची फायटिंग झाली आहे (Dog goat fight video). त्यांच्या या लढाईची शेवटी एक असा ट्विस्ट येतो जो पाहून हसू बिलकुल आवरत नाही.

भांडण, फायटिंग म्हटलं की त्याचा शेवट पाहण्याची उत्सुकता असते. यामध्ये कोणं जिंकणार, कोण हरणार हेच प्रत्येकाला पाहायचं असतं. काही वेळा एखाद्याची क्षमता आपल्याला माहिती असेल तर विजेता कोण ठरेल याचा अंदाज आधीच बांधता येतो. पण आता कुत्रा आणि शेळीची लढाई म्हटली तर त्यामध्ये नेमकं कोण जिंकेल हे सांगू शकत नाही. कारण शेळी तशी शांत स्वभावाचीच असते, पण कुत्राही तसा फार आक्रमक नसतो. आता असे दोन प्राणी एकमेकांसमोर आले तर नेमकं काय होऊ शकतं, हे तुम्हीच पाहा.

व्हिडीओत पाहू शकता, शेळी आणि कुत्रा एकमेकांसमोर उभे आहेत. दोघंही एकमेकांवर हल्ला करण्याचा घाबरवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

हे वाचा -धक्कादायक! स्वतःलाच जिवंत गिळताना दिसला महाकाय साप; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

सुरुवातीला शेळी आपली मान खाली घालून आपल्या डोक्याने कुत्र्याला मारते. कुत्रा थोडा मागे होते. त्यानंतर कुत्रा पुन्हा पुढे येऊन शेळीच्या दिशेने धावतो आणि तोसुद्धा तिला मारण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर शेळी पुन्हा त्याला मारण्याचा प्रयत्न करते.

आता या दोघांमध्ये नेमकी माघार कोण घेणार, कोण कोणावर भारी पडणार हेच पाहण्याची उत्सुकता लागलेली असते. इतक्यात त्या छोट्या कुत्र्याच्या मागून एक मोठा कुत्रा समोर येतो. त्या कुत्र्याला पाहून शेळीला घामच फुटतो. शेळी त्या छोट्या कुत्र्याशी फायटिंग करणं थांबवते आणि मैदान सोडून गप्पपणे लगेच तिथून पळ काढते.

हे वाचा - शिकार करण्याऐवजी मांजरानं कबुतराला केलं KISS, VIDEO पाहून म्हणाल अहो आश्चर्यम्!

dogs_lovers0017 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सना आवडत आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Dog, Goat, Pet animal, Viral, Viral videos