मुंबई, 11 डिसेंबर : सापाच्या (Snake video) शिकारीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत असतात. माणसांवर हल्ला करताना, प्राण्यांना जिवंत गिळताना तुम्ही सापाला पाहिलं असेल. पण कधी सापाने स्वतःवरच हल्ला केल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? (Snake attack video) वाचूनच आश्चर्य वाटलं ना (Shocking video viral). पण अशा एका सापाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात साप स्वतःच स्वतःला गिळताना दिसला आहे (Snake swallowing itself).
माणूस असो वा प्राणी प्रत्येकाची जगण्याची धडपड असते अशात साप स्वतःवर कसा काय हल्ला करू शकतो असंच तुम्हाला वाटेल. त्यामुळे तुम्हाला यावर तुम्हाला सुरुवातीला विश्वास बसणार नाही पण व्हिडीओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. खरंतर व्हिडीओ पाहूनही आपण जे पाहत आहोत ते खरं आहे का? आपला आपल्याच डोळ्यावर विश्वास बसत नाही.
View this post on Instagram
अवघ्या काही सेकंदाचा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ स्नेक हाऊसमध्ये शूट करण्यात आल्याचं दिसतं आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती आपल्या हातात भयंकर साप घेऊन उभी आहे. हा साप त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न नाही करत आहे तर त्याने स्वतःवरच हल्ला केला आहे. आपल्या जबड्यात त्याने स्वतःचंच शरीर धरलं आहे आणि ते गिळण्याचा प्रयत्न करत आहे.
हे वाचा - चिमुकली खेळत असतानाच अचानक समोर आला भलामोठा अजगर अन्...; धडकी भरवणारा VIDEO
snake._.world नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा शॉकिंग व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यांना हे अद्भुत दृश्य पाहायचं आहे, त्यांना हा व्हिडीओ पाठवा, असं पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snake, Snake video, Viral, Viral videos, Wild animal