पोटात दुखायचं म्हणून मुलीला केलं अ‍ॅडमिट, किडनीपासून अन्ननलिकेपर्यंत सापडलं...

पोटात दुखायचं म्हणून मुलीला केलं अ‍ॅडमिट, किडनीपासून अन्ननलिकेपर्यंत सापडलं...

13 वर्षांच्या मुलीच्या पोटाच डॉक्टरांना असं काही सापडलं की पाहून संपूर्ण हॉस्पिटल हादरलं.

  • Share this:

कोइंबतूर, 28 जानेवारी : तामिळनाडू मधील (Tamil Nadu) कोइंबतूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका 13 वर्षांच्या मुलीच्या पोटात बऱ्याच दिवसांपासून दुखत असल्यामुळं तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आहे. डॉक्टरांसमवेत मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनाही हा तपास अहवाल समोर आल्याने आश्चर्यचकित केले. या मुलीच्या पोटातून चक्क अर्धा किलो किलो केस आणि शॅम्पूची पाकिटं असल्याचे समोर आले.

पोटात अर्धा किलो केस

या मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, मुलगी सातवीत शिकत असून, तिला नेहमीच पोटदुखी असते. एक दिवस, जेव्हा पोटातील वेदना वाढल्या तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. जेथे तिच्या पोटाच्या प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी ऑपरेशन केले.

वाचा-लग्नाच्या निमंत्रणासाठी या तरुणांनी लढवली अशी भन्नाट आयडिया

वाचा-भारताची प्रगती नक्की कुठे? 5 महिन्यात 25,000 चाईल्ड पोर्नोग्राफीची प्रकरणे उघड

ऑपरेशन केल्यानंतर तिच्या पोटातून सुमारे अर्धा किलो केस आणि शॅम्पूची रिकामी पाकिटं सापडली. दरम्यान, या मुलीच्या पोटात एवढे केस गेलेच कसे, याबाबत डॉक्टर आश्चर्य व्यक्त केले आहे. डॉक्टरांच्या मते या मुलीने केस गिळले असतील. या मुलीच्या ऑपरेशनसाठी डॉक्टरांना सुमारे 1 ते 1.30 तास लागले.

वाचा-आईची माया आटली, अडीच वर्षाच्या लेकराला पलंगात बंद करून प्रियकरासोबत पळाली आणि...

वाचा-फोटो खरा आहे बरं का! पाहा रात्रीच्या अंधारात कसा दिसतो भारत

मानसिक स्वाथ्य होते खराब

दरम्यान, या मुलीच्या जवळच्या मित्राच्या निधनानंतर ती नैराश्यात होती आणि तिची मानसिक स्थितीही ठीक नव्हती. यामुळे तिने शैम्पू आणि केसांचे रिक्त पाकिटं खाण्यास सुरवात केली. दरम्यान डॉक्टरांनी मुलीचे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सांगितले.

First published: January 28, 2020, 11:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या