चंदीगड, 28 जानेवारी : सोशल मीडियामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांचे गंभीर प्रकार समोर आले. आताही असात मन सुन्न करणार एक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी पलंगात एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलाच्या वडिलांनी त्याच्या पत्नीवर मुलाच्या मृत्यूचा आरोप केला आहे. तर यावरून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे. दशरथ कुमार नावाच्या व्यक्तीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी संध्याकाळी जेव्हा तो कामावरून परत आला तेव्हा त्याला पत्नी आणि मुलगा दिव्यंशु घरी सापडला नाही. दशरथ यांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांना वाटले की त्यांची पत्नी माहेरी गेली असावी. जेव्हा त्यांनी पत्नीला फोन केला तेव्हा तिने मुलाला बेडच्या आत बंद केलं असल्याचं सांगितलं. नंतर, जेव्हा त्याने पलंगाचा उघडला तेव्हा त्याला तिथे मुलाचा मृतदेह आढळला. इतर बातम्या - आजचा मंगळवार या राशींच्या आयुष्यात फुलवणार प्रेम, वाचा 28 जानेवारीचं राशीभविष्य हा संपूर्ण धक्कादायक प्रकार पंजाबच्या चंदीगडमधील बुरेल इथे घडला आहे. दशरथ यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीत सांगितलं की, दिव्यांशूच्या तोंडात एक हातमोजा होता. मुलाची हत्या केल्यानंतर पत्नीने प्रेयसीसह पळ काढल्याचा आरोप केला आहे. पोलीस अधिकारी म्हणाले, “महिलेविरूद्ध सेक्टर 34 च्या पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी घरातून अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मुलाच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. इतर बातम्या - बॉयफ्रेंडसोबत फिरताना घरी येण्यास झाला उशिर, आईला दिलं सामूहिक बलात्कार झाल्याचं कारण!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.