लग्नाच्या निमंत्रणासाठी या तरुणांनी लढवली अशी भन्नाट आयडिया

लग्नाच्या निमंत्रणासाठी या तरुणांनी लढवली अशी भन्नाट आयडिया

लग्नाला यायचं अगत्याचे आमंत्रण त्याने दिलं रोपटी वाटून, आणि कुंडिच्या चार बाजूला चिटकवली आमंत्रण पत्रिका

  • Share this:

मुंबई 28 जानेवारी :  अरे वाह, लग्नपत्रिका अशी पण असते!  अशी पोचपावती मिळेतेय विशालला. कारणंही तसंच आहे. विशालनं लग्नपत्रिकाच तशी छापलीय. एक छानसं रोपटं एका कुंडीत. आणि त्या कुंडीच्या चारही बाजुला लग्नाची निमंत्रण पत्रिका. निमंत्रण लग्नाला येण्याचं. सत्यनारायणाच्या पुजेचं आणि हो हळदीला येण्याचंही. विशाल ज्यांना ज्यांना आपल्या लग्नासाठी निमंत्रित करतो, त्या सगळ्यांकडुन त्याचं कौतुकचं होतंय. पण त्याचवेळी तो अहेर म्हणुन पैशाचं पाकीट नाही तर वह्या मागतोय. आहे की नाही भन्नाट आयडिया. पण ही आयडिया त्यालाच सुचू शकते जो पर्यावरणाप्रती थोडा जागरुक आहे.  जोगेश्वरीला राहणारा विशाल ढवळे आणि मानखुर्दला राहणारी दिपाली कारंडे याचं 30 जानेवारीला लग्न आहे. आणि लग्नाचं आमंत्रण म्हणुन अशा वेगळ्या आमंत्रणपत्रिका विशालने आपल्या ऑफिसमधील सहकारी आणि मित्र परिवारासाठी बनवल्या आहेत.

कशी सुचली कल्पना? आता बघा  लग्नाची पत्रिका घरात आल्यानंतर लग्न झाली की रद्दीत जाते किंवा त्याचा विसर पडतो. विशालला नेमकं तेच नको होतो. आपल्या लग्नात असं काही तरी करावं जे पर्यावरणपुरक असेल आणि त्याचा समाजाला फायदा होईल, असं काहीतरी विशालला करायचं होतं नेमकं त्याचवळेी विशालच्या मित्राने सचिम रहाटेनी विशालला या अनोख्या कल्पनेबद्दल सांगितलं. आणि मध्यमवर्गीय माणुस आपलं आधी बजेट बघेल ना. तसचं विशाल ने केलं. थेट बाजारात जाउन कुंड्च्या किंमतीची चौकशी केली. आणि रोपटी देणाऱ्या एका एनजीओशी संपर्क केला.

मिलिंद देवरांच्या पत्रामुळे खळबळ, काँग्रेसच्या मंत्र्यांची सोनियांकडे तक्रार

एक बीज, एक सावली, एक रोप शिक्षणा साठी. आरेमधील आदिवासी पाड्यात एक एनजीओ शिक्षणाबबत काम करतेय. एक बीज, एक सावली ही एनजीओ अगदीच लहान आहे. १०-१५ जण एकत्रित होवून तयार झालेली संघटना काय करते तर आदिवासी पाड्यातील आदिवासींच्या संमतीने रोपटी तयार करेत. ही रोपटी कुणीही घेवून जाऊ शकतं. फक्त एका रोपट्यापायी तुम्हाला ६ वह्या द्याव्या लागतात.

कश्मीर पोलिसांना मोठं यश, लष्कर-ए-तोयबाच्या बड्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं

या वह्या ही एनजीओ आरेमधील आदिवासी पाड्यातील शिक्षण घेत असेल्या मुलांना वाटतात. म्हणजे इथे पैसा नाही तर शिक्षण दिलं जातं. ही संघटना इतकी लहान आहे की त्यांनी अजुन स्वत:च्या एनजीओला अजून रजिस्टरही नाही केलं असं त्यांचं म्हणणं आहे. संजिव हे या संघटनेचे  संस्थापक सदस्य आहेत.

विशालने यांच्याकडुन 60 रोपटी घेत त्या बदल्यात वह्या तर दिल्या पण आपल्या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना आहेर म्हणुन वह्या ही आणण्याचा विशालचा आग्रह थेट या पत्रिकेवर दिसतो. काय मग तुम्हालाही वाटतंय का असंच काहीतरी आपल्या लग्नासाठी करावं? मग विचार काय करताय.अहो एक नव्या नात्याची सुरुवात करायला यापेक्षा अधिक चांगलं काय असू शकत?

 

 

First published: January 28, 2020, 10:29 AM IST
Tags: marrage

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading