मराठी बातम्या /बातम्या /Viral /डॉक्टरांनी नवजात बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारासाठी हातात घेताच झाला चमत्कार अन्...

डॉक्टरांनी नवजात बाळाला केलं मृत घोषित; अंत्यसंस्कारासाठी हातात घेताच झाला चमत्कार अन्...

एका महिलेनं घरीच एका बाळाला जन्म दिला. बाळ जन्मताच मरण पावल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

एका महिलेनं घरीच एका बाळाला जन्म दिला. बाळ जन्मताच मरण पावल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

एका महिलेनं घरीच एका बाळाला जन्म दिला. बाळ जन्मताच मरण पावल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

नवी दिल्ली 03 जानेवारी : अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की जगात चमत्कार नावाची काही गोष्ट नसते. लोक याला अंधश्रद्धा समजतात, तर काही लोग त्याला योगायोग असं नाव देतात. मात्र ब्राझीलमधून नुकतंच अशी एक घटना समोर आली आहे, जे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. ही घटना हैराण करणारी आहे. यात मृत घोषित करण्यात आलेलं बाळ जिवंत झालं आहे (Doctors Declared Alive Baby Dead).

मला 'असाच' पार्टनर पाहिजे! बॉयफ्रेंडसाठी तरुणीची विचित्र अट; मिळालं सडेतोड उत्तर

ही घटना जाणून तुम्हीही नक्कीच हैराण झाला असाल. ब्राझीलच्या रॉनडोनियामध्ये 27 डिसेंबरला अशी घटना घडली, जी पाहून सगळेच थक्क झाले. मिरर वेबसाईटच्या वृत्तानुसार, यात एका महिलेनं घरीच एका प्रीमॅच्योर बाळाला जन्म दिला. बाळ जन्मताच मरण पावल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. मात्र, देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण इथे खरी ठरली.

रिपोर्टनुसार, या घटनेतील महिलेला माहितीही नव्हतं की ती गरोदर आहे. पोटात दुखत असल्याने दोन वेळा ती रुग्णालयात गेली. मात्र डॉक्टरांनी तिला हे सांगून घरी पाठवलं की ती गरोदर नाही. दुसऱ्यांदा घरी जाताच तिच्या वेदना आणखीच तीव्र झाल्या आणि घरातच तिने बाळाला जन्म दिला. हे बाळ प्रेग्नंसीच्या पाचव्या महिन्यातच जन्मलं आणि जन्माच्या वेळी त्याचं वजन केवळ १ किलो होतं. मात्र जेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हे बाळं जन्मतानाच मृत होतं (Doctor Declared Premature Baby Dead) .

'त्या' जेवणामुळे सुरू होताच कपलच्या Love Story चा END; कारण जाणून व्हाल थक्क

रुग्णालयातच फ्यूनरल डायरेक्टरला बोलावलं गेलं आणि बाळाला दफन करण्याची जबाबदारी त्याच्याकडेच देण्यात आली. तो या बाळाला पहाटे तीनच्या सुमारास दफन करण्यासाठी घेऊन गेला. काहीच तासात सर्व कामं पूर्ण होताच त्याने बाळाला उचलून घेतलं. यावेळी बाळाच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचं त्याला जाणवलं. लगेचच हा व्यक्ती बाळाला रुग्णालयात घेऊन गेला आणि आयसीयूमध्ये दाखल केलं. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि फ्यूनरल होमने रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

First published:
top videos

    Tags: Baby died, Shocking news, Viral news