बंगळुरू 01 जानेवारी : हल्ली हृदयविकाराच्या झटक्यासारख्या घटना अगदी सामान्य झाल्या आहेत. हृदयविकाराचा झटका कधी, कोणाला आणि कुठे येईल हे सांगता येत नाही. आता तर अगदी तरुणांनाही हृदयविकाराचा झटका येऊ लागला आहे. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यात लोकांना नाचताना किंवा चालता-बोलता हृदयविकाराचा झटका आला आणि आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत, जर काही सर्वात उपयुक्त असेल तर ते आहे सीपीआर. ज्याद्वारे हृदयविकाराच्या झटका आलेल्या लोकांचे प्राण त्वरित मदत देऊन वाचवले जाऊ शकतात. शॉपिंग सेंटरमध्ये आलेल्या एका व्यक्तीसोबतही असंच घडलं. 3 सिंहिणींनी मगरीला घेरुन अचानक केला हल्ला, पण..; शेवटी कोण जिंकलं? पाहा VIDEO ट्विटर अकाऊंट @rohitdak वरुन एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यात दिसतं की शॉपिंग सेंटरमध्येच एक व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला. या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र त्याचवेळी शेजारीच एक डॉक्टरही खरेदी करत होते. हे दृश्य पाहताच त्यांनी लगेचच CPR देऊन या व्यक्तीचा जीव वाचवला. हा व्हिडिओ आतापर्यंत 4.3 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे.
ही घटना बंगळुरूमधील IKEA स्टोअरमध्ये घडली. ज्यात खरेदी करत असतानाच एक व्यक्ती अचानक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर हा व्यक्ती शुद्धीवर येत नव्हता. यानंतर एकच गोंधळ उडाल्याचं पाहून शेजारीच खरेदी करत असलेल्या एका डॉक्टरने लगेचच याठिकाणी धाव घेतली. त्यांनी लगेचच बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला CPR देण्यास सुरूवात केली आणि जवळपास १० मिनिटं सीपीआर देत राहिले. बराच वेळानंतर आणि भरपूर मेहनतीनंतर हार्ट अटॅक आलेल्या या व्यक्तीने डोळे उघडले, हे पाहून सगळ्यांच्याच जीवात जीव आला. डॉक्टरने वेळेवर मदत करत या व्यक्तीचा जीव वाचवला. VIDEO : बाईकस्वाराचा श्वास रोखायला लावणारा स्टंट; क्षणात बाईक पोहोचवली डोंगरावर व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे, की माझ्या वडिलांनी एक जीव वाचवला. हे प्रकरण बंगळुरूमधील आहे. इथे एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची नाडी थांबत होती. वडिलांनी 10 मिनिटांपेक्षा जास्त काळ प्रयत्न केले आणि त्यांना शुद्धीवर आणलं. हा व्यक्ती भाग्यवान होता की एक प्रशिक्षित ऑर्थोपेडिक सर्जन त्याच्या शेजारीच खरेदी करत होता.’ अशा घटना आजकाल भरपूर प्रमाणात घडताना दिसतात. अशात अशा काहींचा जीव वाचतोही ज्यांना लगेचत सीपीआर मिळतो. याच कारणामुळे शाळेमध्येही याबाबतचं बेसिक प्रशिक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे.

)







