जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : बाईकस्वाराचा श्वास रोखायला लावणारा स्टंट; क्षणात बाईक पोहोचवली डोंगरावर

VIDEO : बाईकस्वाराचा श्वास रोखायला लावणारा स्टंट; क्षणात बाईक पोहोचवली डोंगरावर

VIDEO : बाईकस्वाराचा श्वास रोखायला लावणारा स्टंट; क्षणात बाईक पोहोचवली डोंगरावर

स्टंटबाजीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातलाच हा एक व्हिडीओ असून यामध्ये रायडर त्याची बाईक सरळ चढण असलेल्या डोंगावर नेताना दिसत आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 30 डिसेंबर : एका एनर्जी ड्रिंकच्या जाहिरातीमध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन पर्वतांमधील धोकादायक रस्त्यांवर बाईक चालवत असल्याचं तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. ही जाहिरात बघूनच अनेकांना भीती वाटते. प्रत्यक्षात अशाप्रकारे गाडी चालवण्याचं धाडस करणं म्हणजे जीवाची बाजी लावण्यासारखं आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओतील तरुणानं, हा धोका पत्करल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती बाईकसह उंच डोंगरावर चढत आहे. एखादी व्यक्ती असा धोकादायक स्टंट करू शकते, यावर विश्वास ठेवणंच कठीण जात आहे. या व्यक्तीचा हा धोकादायक स्टंट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ‘एनडीटीव्ही’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बाईक स्टंट करणाऱ्यांची अजिबात कमतरता नाही. जगभरात एकापेक्षा एक सरस स्टंटमॅन आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बाईक स्टंट व्हिडिओची गोष्टच निराळी आहे. Lo+Viral नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती जीवावर उदार झाल्याचं दिसत आहे. ‘काहीवेळा अशक्यही शक्य होते,’ अशा कॅप्शनखाली हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हेही वाचा : आलियाच नाही, तर सिंहालाही सिल्की केसांचं वेड, पाहा व्हिडीओ व्हिडिओतील व्यक्ती न थांबता बाईकवरून थेट डोंगरावर जात असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे हा डोंगर अतिशय सरळ चढण असलेला आहे. अशा डोंगरांवर पायी चढाई करणं देखील कठीण असतं. अशा स्थितीत एक व्यक्ती बाईक घेऊन क्षणात डोंगरमाथ्यावर जाताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

    जाहिरात

    हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स पूर्णपणे थक्क झाले आहेत. न थांबता डोंगरावर बाईक चढवता येईल, याची कल्पना करणंही अनेकांना जड जात आहे. आतापर्यंत हजारो युजर्सनी हा व्हिडिओ लाईक केला असून काहींनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरनं कमेंट केली आहे, ‘काय स्टंट आहे’. तर, आणखी एका युजरनं कमेंट केली आहे की, ‘मला आश्चर्य वाटत आहे.’ हेही वाचा :  12 लाख रुपये खर्च करून माणसाने घेतलं श्वानाचं रूप; आता होतोय पश्चाताप सोशल मीडिया साईट्सवर अनोखे व्हिडिओज पहायला मिळतात. काही व्हिडिओ गंमतशीर असतात तर काही व्हिडिओ लोकांना आश्चर्य व्यक्त करायला लावणारे असतात. मात्र, सध्या व्हायरल होत असलेला हा बाईक स्टंटचा व्हिडिओ बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात