मराठी बातम्या /बातम्या /Viral /विमानातच दोनदा हृदयविकाराचा झटका आला अन् बेशुद्ध पडला व्यक्ती, सहप्रवाशाने असे वाचवले प्राण

विमानातच दोनदा हृदयविकाराचा झटका आला अन् बेशुद्ध पडला व्यक्ती, सहप्रवाशाने असे वाचवले प्राण

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

विमान ब्रिटनहून मुंबईला येत होते. या फ्लाइटमध्ये अचानक एक प्रवासी अचानक बेशुद्ध पडला. त्याला ना श्वास घेता येत होता ना त्याची नाडी सुरू होती

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली 07 जानेवारी : काही दिवसांपूर्वीच एक घटना समोर आली होती, ज्यात शॉपिंग मॉलमध्ये एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी मॉलमध्ये उपस्थित असलेल्या एका डॉक्टरने त्याचे प्राण वाचवले. अशीच एक घटना एका विमानातही घडली. यात विमानातच एका व्यक्तीला दोनदा हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने त्या फ्लाइटमध्ये एक डॉक्टर उपस्थित होता आणि त्यांनी त्या व्यक्तीचा जीव दोन्ही वेळेस वाचवला.

VIDEO: शॉपिंग करताना अचानक आला Heart Attack; शेजारीच उभा असलेल्या डॉक्टरने 'चमत्कार' केला

एअर इंडियाच्या विमानात ही घटना घडली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान ब्रिटनहून मुंबईला येत होते. या फ्लाइटमध्ये अचानक एक प्रवासी अचानक बेशुद्ध पडला. त्याला ना श्वास घेता येत होता ना त्याची नाडी सुरू होती. या विमानात डॉ.विश्वराज वेमला हे देखील प्रवास करत होते. ते लगेच त्या प्रवाशाजवळ पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे डॉक्टर ब्रिटनमधील बर्मिंघम येथील क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये हेपॅटोलॉजिस्ट आहेत. त्यांनी प्रवाशाची तपासणी केली आणि नंतर फ्लाइटच्या केबिन क्रूला इमर्जन्सी किट मागितले. यानंतर ते आपल्या पद्धतीने या व्यक्तीवर उपचार करू लागले. सुमारे तासाभरानंतर रुग्ण शुद्धीवर आला आणि डॉक्टरांशी बोलला. यानंतर आश्चर्याची बाब म्हणजे त्यांना पुन्हा एकदा हृदयविकाराचा झटका आला.

मुंबई मेट्रोच्या दरवाजात अडकला ड्रेस; इतक्यात ट्रेनही सुरू झाली, पुढे तरुणीसोबत भयानक घडलं, VIDEO

रुग्णाला दुसरा झटका आल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा उपचारास सुरुवात केली. दरम्यान, विमानाच्या पायलटने विमान पाकिस्तानात उतरवण्याची परवानगी मागितली असता तेथील अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी अनेक प्रयत्नांनंतर रुग्ण शुद्धीवर आला. याआधी रुग्णाला हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता, असंही सांगण्यात आलं.

First published:

Tags: Heart Attack, Travel by flight