• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • डॉक्टरच्या एका चुकीमुळे तरुणीचं आयुष्य उद्धवस्त; आधी धक्क्यानं आईचा मृत्यू, मग बॉयफ्रेंडनंही सोडली साथ

डॉक्टरच्या एका चुकीमुळे तरुणीचं आयुष्य उद्धवस्त; आधी धक्क्यानं आईचा मृत्यू, मग बॉयफ्रेंडनंही सोडली साथ

या घटनेमुळे केवळ तिचं आयुष्यच बदललं नाही तर तिच्या आईनंही जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर महिलेचा बॉयफ्रेंडही (Breakup With Boyfriend) तिला सोडून गेला.

 • Share this:
  नवी दिल्ली 08 ऑक्टोबर : डॉक्टरांकडूनही अनेकदा मोठ्या चुका (Mistakes of Doctor) होतात आणि त्यांच्या याच चुका अनेकांच्या जीवावर बेततात. टिकटॉक यूजर (Tiktok User) @elzbthhope हिच्यासोबतही अशीच भयंकर घटना (Shocking Incident) घडली. या घटनेमुळे केवळ तिचं आयुष्यच बदललं नाही तर तिच्या आईनंही जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर महिलेचा बॉयफ्रेंडही (Breakup With Boyfriend) तिला सोडून गेला. मात्र, जेव्हा सत्य समोर आलं, तेव्हा ही महिला प्रचंड संतापली. तिनं व्हिडिओच्या माध्यमातून टिकटॉकवर संपूर्ण प्रकरण सांगितलं. जगातील सर्वात लांब नाक असलेला व्यक्ती; 71 वर्ष वय असून अजूनही वाढतीये लांबी महिलेनं व्हिडिओमध्ये सांगितलं, की ती आपल्या दरवर्षी होणाऱ्या चेकअपसाठी महिला डॉक्टरकडे गेली. 20 वर्षापासून प्रॅक्टिस करणाऱ्या ऑब्‍सटेट्रिक्‍स गायनॅकोलॉजिस्‍ट डॉक्टरनं तिला सांगितलं की ती एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV Positive) आहे. हे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिला या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. तिची आई हिस्टिरियानं ग्रस्त होती. आपल्या मुलीबद्दल हे सगळं ऐकताच ती सदम्यात गेली आणि तिचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर या आजाराबद्दल समजताच तिचा बॉयफ्रेंडही तिला सोडून गेला. द सननं आपल्या वृत्तात म्हटलं महिलेनं सांगितलं की, डॉक्टरांनी ही बातमी मला सांगत म्हटलं, की तू जास्तीत जास्त जगावं यासाठी प्रयत्न करू. मी बराच काळ सदम्यात राहिले. यानंतर अनेक आठवड्यांनी मी दुसऱ्या डॉक्टरकडे जात अनेक टेस्ट केल्या. त्यात हे उघड झालं, की मला कोणताही आजार नाही. यासोबतच या डॉक्टरांनी म्हटलं, की आम्हाला समजलं नाही ते डॉक्टर कशाच्या आधारावर तुम्हाला एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हटले. रिपोर्टमधून तिला काहीही आजर नसल्याचं स्पष्ट झालं. यानंतर ही महिला पुन्हा एकदा त्या महिला डॉक्टरांकडे गेली. तेव्हा या डॉक्टरनं म्हटलं, की हे ऐकून चांगलं वाटलं की तुला एचआयव्ही नाही. मोठ्या हुशारीनं सोनाराच्या दुकानात चोरी करत होतं कपल पण...; पाहा Shocking Video टिकटॉक यूजरनं शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 847k हून अधिकवेळा पाहिला गेला आहे. सोबत अनेकांनी कमेंट करत डॉक्टरवर टीकाही केली आहे. एका यजूरनं लिहिलं, मी कल्पनाही करू शकत नाही, तुम्हाला कसं वाटलं असेल. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, मी आणखी अशा काही लोकांना ओळखतो ज्यांची चुकीची टेस्ट केली गेली. त्यामुळे नेहमी एकपेक्षा जास्त डॉक्टरांकडे तपासणी करायला हवी.
  Published by:Kiran Pharate
  First published: