मराठी बातम्या /बातम्या /Viral /हा आहे जगातील सर्वात लांब नाक असलेला व्यक्ती; 71 वर्ष वय असून अजूनही वाढतीये लांबी

हा आहे जगातील सर्वात लांब नाक असलेला व्यक्ती; 71 वर्ष वय असून अजूनही वाढतीये लांबी

तुर्क मेहमेत (Turk Mehmet) यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. कारण त्यांच्या नाकाहून लांब नाक (Longest Nose in World) कोणाचंच नाही.

तुर्क मेहमेत (Turk Mehmet) यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. कारण त्यांच्या नाकाहून लांब नाक (Longest Nose in World) कोणाचंच नाही.

तुर्क मेहमेत (Turk Mehmet) यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. कारण त्यांच्या नाकाहून लांब नाक (Longest Nose in World) कोणाचंच नाही.

नवी दिल्ली 08 ऑक्टोबर : जगभरात अनेक असे लोक आहेत, जे आपल्या अजब टॅलेंटमुळे आपल्या नावी रेकॉर्ड (Weird World Records) नोंदवतात. तर काही माणसांच्यात आणि प्राण्यांच्यात जन्मतःच असे काही फिचर्स येतात, ज्यामुळे काही न करताच त्यांचं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्य सामील होतं. हे फिचर्स त्यांना जन्मतःच मिळालेले असतात. जगातील सर्वात उंच व्यक्ती किंवा जगातील सर्वाच लहान व्यक्ती हे सगळे यातच येतात. सध्या असाच एक तुर्कीमध्ये (Turkey) राहणारा व्यक्ती चांगलाच चर्चेत आहे. याचं कारण आहे या व्यक्तीचं नाक. या व्यक्तीचं नाक जगात सध्या सर्वात मोठं आहे. हैराण करणारी बाब म्हणजे वयाच्या 71 व्या वर्षीही या व्यक्तीचं नाक वाढतच आहे.

बापरे! एका पक्षासाठी एवढा त्याग? तरुणीनं 2 वर्षांपासून बाहेर फिरणंही सोडलं

तुर्क मेहमेत (Turk Mehmet) यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. कारण त्यांच्या नाकाहून लांब नाक (Longest Nose in World) कोणाचंच नाही. तुर्क मेहमेत यांच्या नाकाची लांबी 8.8 सेंटीमीटर आहे. तुर्क मेहमेत यांच्या लांब नाकामुळे मागील 11 वर्षांपासून त्यांच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. दरवर्षी अनेक लोक त्यांचा हा रेकॉर्ड तोडण्यासाठी समोर येतात. मात्र, आतापर्यंत त्यांच्यापेक्षा लांब नाक कोणाचंही दिसलेलं नाही. याचं कारण हे आहे, की तुर्क यांचं नाव दिवसेंदिवस वाढतच आहे.

नुकतंच गिनीज वर्ल्ड रेकार्ड्सनं सोशल मीडियावर 11 वर्षांपासून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या तुर्क मेहमेत यांच्याबद्दल पोस्ट केली आहे. कंपनीनं लिहिलं, की मेहमेत यांचं नाक सर्वात लांब आहे. सोबतच अकरा वर्षांपासून हा रेकॉर्ड आपल्या नावावर कायम ठेवणाऱ्या मेहमेत यांचं अभिनंदन.

हजामत पाहूनच फुटला घाम; जीव मुठीत धरून सलूनमधून पळाला तरुण; VIDEO VIRAL

मेहमेत यांच्या नावावर अकरा वर्षांपासून हा रेकॉर्ड असला तरी एक व्यक्ती असा होता ज्याचं नाक मेहमेतपेक्षाही लांब होतं. आजपर्यंतचा सगळ्यात लांब नाकाचा रेकॉर्ड अठराव्या शतकातील इंग्रज थॉमस वेडर्स यांच्या नावावर होता. त्यांचं नाक साडेसात इंच होतं. म्हणजेच मेहमेत यांच्या नाकापेक्षाही दुप्पट लांब होतं. मिळालेल्या माहितीनुसार, थॉमस एका सर्कसमध्ये काम करत असत. त्यांच्या मृत्यूनंतर इतरही अनेक लोक या लिस्टमध्ये आले. मात्र, मागील ११ वर्षांपासून मेहमेत यांच्या नावावर हा रेकॉर्ड कायम आहे.

First published:

Tags: Viral news, World record