मराठी बातम्या /बातम्या /Viral /तुम्हीही फ्रिजमधील शिळं अन्न खात असाल तर सावधान; एका चुकीमुळे कापावा लागला युवकाचा पाय

तुम्हीही फ्रिजमधील शिळं अन्न खात असाल तर सावधान; एका चुकीमुळे कापावा लागला युवकाचा पाय

सुरुवातीला त्याला भरपूर ताप आला आणि नंतर त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सुरुवातीला त्याला भरपूर ताप आला आणि नंतर त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सुरुवातीला त्याला भरपूर ताप आला आणि नंतर त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नवी दिल्ली 21 फेब्रुवारी : आजकाल खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात इतर गोष्टी मिसळल्या जातात, त्यामुळे लोक आजारी पडतात. रेस्टॉरंटमध्येही जेवणाची क्वालिटी चांगली नसते. यामुळे अनेकदा लोकांना बाहेरचं अन्न खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. इंग्लंडमधील एका व्यक्तीसोबतही बाहेरचं शिळं अन्न खाल्ल्यानंतर असंच काहीसं घडलं (Dangerous Infection Due to Stale Food). याचा परिणाम म्हणजे त्याचा पायत कापावा लागला.

तुमच्याही बॉडीवर येताहेत का स्ट्रेच मार्क्स; हे घरगुती उपाय आहेत त्यावर फायदेशीर

डेली स्टारच्या वृत्तानुसार, या व्यक्तीसोबत हैराण करणारी घटना घडली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये जेसी नावाच्या व्यक्तीसोबत घडलेल्या या घटनेबद्दल जाणून सगळेच हैराण झाले. रिपोर्टनुसार, या तरुणाचा मित्र एका रात्री रेस्टॉरंटमधून चिकन आणि नूडल डिश घेऊन आला होता आणि उरकलेलं अन्न त्याने फ्रिजमध्ये ठेवलं.

दुसऱ्या दिवशी युवकाने हे उरलेले पदार्थ खाल्ले. यानंतर त्याची तब्येत बिघडू लागली. सुरुवातीला त्याला भरपूर ताप आला आणि नंतर त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रिपोर्ट्सनुसार या युवकाला कोणत्याही प्रकराची अॅलर्जी नव्हती. तो दारूही पित नसे. मात्र तो एका आठवड्यात सिगरेटचे दोन पॉकेट संपवत असे.

प्रायव्हेट पार्टच्या दुखण्याने हैराण? या घरगुती उपायांनी होईल सुटका

रुग्णालयात त्याची अवस्था आणखीच बिघडत गेली आणि त्याला हेलिकॉप्टरने दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जावं लागलं. रिपोर्टनुसार सुरुवातीला तो अगदी ठीक होता मात्र चिकन राईसमुळे त्याच्या पोटात भयंकर दुखत होतं आणि त्याला मळमळ होऊ लागली होती. हळूहळू त्याच्या त्वचेचा रंगही बदलू लागला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीत समोर आलं की या व्यक्तीला इतकं भयंकर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे की त्याची किडनी फेल झाली असून त्याचं रक्त गोठण्यासा सुरुवात झाली होती. डॉक्टरांना दिसलं की त्याला सेप्सिस झालं आहे. त्याच्या बोटांच्या टिशूमध्ये गँगरीन डेव्हलप होऊ लागलं होतं. त्याच्या पायाची अवस्थाही भयंकर झाली होती. यामुळे या व्यक्तीचा पाय कापावा लागला. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Operation, Shocking news