मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Sex Education | प्रायव्हेट पार्टच्या दुखण्याने हैराण? या घरगुती उपायांनी होईल सुटका

Sex Education | प्रायव्हेट पार्टच्या दुखण्याने हैराण? या घरगुती उपायांनी होईल सुटका

लघवी करताना किंवा विर्यस्खलन होताना वेदना होत असल्यास, ही एक गंभीर समस्या आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लघवी करताना किंवा विर्यस्खलन होताना वेदना होत असल्यास, ही एक गंभीर समस्या आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

लघवी करताना किंवा विर्यस्खलन होताना वेदना होत असल्यास, ही एक गंभीर समस्या आहे. त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 20 फेब्रुवारी : पुरुषांना अनेकदा प्रायव्हेट पार्टच्या (male private part) दुखण्याची समस्या असते. हे काही रोग, जखम किंवा संसर्गामुळे झालेल्या जखमेमुळे होऊ शकते. लघवी करताना किंवा वीर्यस्खलन होताना वेदना होत असल्यास ही एक गंभीर समस्या आहे, त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वास्तविक, जेव्हा वेदना होतात तेव्हा काही घरगुती उपाय मदत करू शकतात. अशाच काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया लिंगामध्ये वेदना पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारची लैंगिक समस्या असल्यास जसे की बॅलेनाइटिस, लैंगिक संक्रमित रोग, मूत्रमार्गात संसर्ग, दुखापत किंवा कर्करोगासारखा कोणताही गंभीर आजारामुळे पुरुषाच्या जननेंद्रियात वेदना जाणवतात. जननेंद्रियात वेदना कमी करण्यासाठी उपाय myUpchar नुसार, लिंगाला थंड शेक दिल्यास वेदना कमी होऊ शकतात. यासाठी एका स्वच्छ टॉवेलमध्ये बर्फाचे तुकडे टाकून पेनिसभोवती गुंडाळा. वेदना आणि सूज असेल तेव्हा व्हिटॅमिन ई असलेली क्रीम लावणे देखील फायदेशीर ठरू शकते. लिंगात दुखण्याची समस्या असल्यास घट्ट अंडरवेअर आणि कपडे घालू नका, सैल कपडे घातल्याने आत घाम येत नाही, त्यामुळे बॅक्टेरियाचा धोका होत नाही. वेदना कमी होईपर्यंत लैंगिक संबंध टाळा. लिंगातील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी ibuprofen सारखी नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे घेतली जाऊ शकतात. संसर्गामुळे दुखत असेल तर दही किंवा ऍपल सायडर व्हिनेगर लिंगावर लावल्यास फायदा होतो. अविवाहित, व्हर्जिन पुरुषाचा प्रायव्हेट पार्टसोबत नको तो खेळ; पाहून डॉक्टरही शॉक जननेंद्रियात वेदना टाळण्यासाठी काय करावे? लिंगाची नियमित स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, स्वच्छता न ठेवल्यास संसर्ग होण्याचा धोका असतो. संभोग करताना कंडोम वापरणे, संसर्गाची लागण झालेल्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध न ठेवणे, सेक्स करताना लिंग वाकवणे किंवा त्यावर जास्त दबाव टाकणारी स्थिती टाळणे. मूत्रमार्गात सूज येणे, जळजळ होणे किंवा खाज येणे अशी कोणतीही समस्या असेल तर लक्षात ठेवा की या काळात सेक्स करू नका. डॉक्टरांचा सल्ला आवश्यक myUpchar नुसार, एखाद्या पुरुषाला वीर्यस्खलन दरम्यान वेदना, लिंगातून स्त्राव किंवा स्पर्श करताना वेदना जाणवत असल्यास, त्याने त्वरित डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करून घ्यावी. याशिवाय लघवीतून रक्त येणे, वीर्याचा रंग बदलणे, लिंगाच्या आजूबाजूला पुरळ उठणे, लैंगिक संबंधात अनास्था इत्यादी समस्याही असू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. ही समस्या काही गंभीर आजारामुळे देखील असू शकते. (जसे की लिंगाच्या शिरा खूप कडक होणे). याशिवाय पुरुषाचे जननेंद्रिय किंवा अंडकोषाच्या थैलीमध्ये गाठी तयार होऊ लागतात. आपल्याला यापैकी कोणत्याही समस्येचा संशय असल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. News18 वरील आरोग्यविषयक लेख myUpchar.com द्वारे लिहिलेले आहेत. myUpchar हे आरोग्य बातम्यांचे देशातील पहिले आणि प्रमुख माध्यम आहे. myUpchar मध्ये डॉक्टरांसह संशोधक आणि पत्रकार तुमच्यासाठी आरोग्याशी संबंधित सर्व माहिती घेऊन येत असतात.
First published:

Tags: Sex education

पुढील बातम्या