जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भारतातील शहरांचा असा लागतो भल्या-भल्यांना लळा; स्कॉटलंडमध्ये म्हणून वसवलंय हे शहर

भारतातील शहरांचा असा लागतो भल्या-भल्यांना लळा; स्कॉटलंडमध्ये म्हणून वसवलंय हे शहर

भारतातील शहरांचा असा लागतो भल्या-भल्यांना लळा; स्कॉटलंडमध्ये म्हणून वसवलंय हे शहर

तरुणीने या प्रवासाचा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. यामध्ये तिने पटन्यापर्यंतचा प्रवास कारनेच केल्याचे दाखवले. मुलीचा प्रवास मिल्टन केन्सपासून सुरू झाला, जो अखेर पटना येथे संपला. हा प्रवास एकूण सात तासांचा होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 09 मे : सध्या सोशल मीडिया साईट यूट्यूबवर एका मुलीचा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे. या मुलीने लंडन ते पटना हा प्रवास कारने पूर्ण केला. आता तुम्ही विचार करत असाल की या मुलीने गाडीने एवढा लांबचा प्रवास कसा काय पूर्ण केला. तुमचा आणखी काही गैरसमज होण्यापूर्वी हे जाणून घ्या की, आपण ज्या पटन्याबद्दल बोलत आहोत ते बिहारमध्ये नाही. होय, जगात आणखी एक शहर आहे, ज्याचे नाव पटना आहे. हे शहर भारतातही नाही. हे शहर स्कॉटलंडमधील आहे. लंडन, यूकेपासून सहाशे किलोमीटर अंतरावर आणखी एक पटना आहे. मुलीने तो प्रवास या पटन्याला केलाय. तरुणीने या प्रवासाचा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. यामध्ये तिने पटन्यापर्यंतचा प्रवास कारनेच केल्याचे दाखवले. मुलीचा प्रवास मिल्टन केन्सपासून सुरू झाला, जो अखेर पटना येथे संपला. हा प्रवास एकूण सात तासांचा होता. ज्यामध्ये मुलीने अनेकवेळा थांबा घेतला. रात्री तिने स्कॉटलंडमधील एका गावात विश्रांती घेतली आणि सकाळी पूर्व आयरशायरला निघून गेली. इथे दिसत असलेले पटना शहर भारतात नसून लंडनमध्ये आहे. हे वाचा -  VIDEO : पाण्यात मगर आणि अजगराची जबरदस्त फाईट; अनपेक्षित झाला लढाईचा शेवट 2 हजार लोकसंख्या - या पटना शहराबद्दल मुलीने सांगितले की, या शहरात फक्त दोन हजार लोक राहतात. आजपासून 220 वर्षांपूर्वी या शहराचे नाव पटना असे ठेवण्यात आले होते. याचे नाव विल्यम फुलअर्ट यांनी दिले. त्यांचे वडील काही काळ भारतातील पटना येथे राहत होते. ते ब्रिटीश सैन्यात होते आणि त्यांची पोस्टिंग पाटण्याला होती. विल्यमही काही काळ वडिलांसोबत पाटण्यात राहत होता. तो या शहराशी इतका जोडला गेला की त्याने स्कॉटलंडमध्ये एक गाव वसवले आणि त्याचे नाव पटना ठेवले. हे वाचा -  6 महिन्याने रुग्णालयातून घरी आली पत्नी; पतीची प्रतिक्रिया व्हाल भावुक, Video इथं विदेशी गंगा आहे - पटना, भारताच्या बिहार राज्याची राजधानी, गंगा नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. तर स्कॉटलंडमधील पटना शहर दून नदीच्या काठावर वसलेले आहे. स्कॉटलंडमधील पटनाबद्दल तुम्ही पहिल्यांदाच ऐकले असेल, परंतु स्कॉटलंडमधील रहिवासी बिहारमधील पटन्याबद्दल अनभिज्ञ नाहीत. या पटनाच्या शाळांमध्ये बिहारच्या पटन्याबद्दल शिकवले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात