नवी दिल्ली 08 मे : प्रेमाच्या अनेक कथा (Love Story) तुम्ही पाहिल्या आणि ऐकल्या असतील. खऱ्या प्रेमाची उदाहरणं देणारे लोक अनेकांनी पाहिले असतील. पण आजच्या काळात प्रेम हे सुद्धा स्वार्थापुरतंच मर्यादित राहिल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. जेव्हा जोडप्यांना एकमेकांबद्दल नाविन्य किंवा एकमेकांमध्ये विशेष रस राहात नाही, तेव्हा ते वेगळं होतात. मात्र, एका वृद्ध जोडप्याचा असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video of Old Couple) होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की खरे प्रेम काय असतं? फक्त कथांमध्ये ऐकलेल्या प्रेमकथेपेक्षा अगदी वेगळी अशी ही प्रेमकथा तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल . वृद्ध जोडप्याचं हे प्रेम लोकांचं लक्ष वेधत आहे. पोपट शोधून द्या आणि इतके हजार जिंका; पक्षाच्या आठवणीने व्याकूळ मालकाने शहरभर लावले पोस्टर्स असे काही व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केले जातात जे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करतात. असाच एक इमोशनल व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. यामध्ये दिसतं की एका वृद्ध व्यक्तीची पत्नी सहा महिन्यांपासून रुग्णालयात असते. मात्र ती घरी परतताच वृद्ध पतीची रिअॅक्शन पाहून तुमचेही डोळे पाणावतील. इतक्या दिवसांनी पत्नीला घरी आल्याचं पाहून या व्यक्तीला आपले अश्रू आवरता आले नाहीत. सुरुवातीला ते घराबाहेर पत्नीची वाट पाहू लागले. यानंतर पत्नी आली तेव्हा ते तिच्यापासून दूर जायला तयार नव्हते.
आजच्या काळात अनेक जोडप्यांमधील प्रेम अगदी काही काळातच संपतं, अशात या जोडप्याने खरं प्रेम काय असतं हे दाखवून दिलं. व्हिडिओच्या सुरुवातीला वृद्ध व्यक्ती घराच्या दारात बसलेला दिसतो. यानंतर रुग्णवाहिका येताना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. यासोबतच ते थोडं नर्व्हसही होतात. रुग्णवाहिकेतून पत्नी बाहेर येताच त्यांनी तिचा हात पकडला. याशिवाय घराच्या आत गेल्यावरही त्यांनी आपल्या पत्नीच्या हातावर किस केलं. Wedding Video: गुरुजी बोलावत राहिले…नवरदेव वाट पाहत राहिला; नवरी मात्र भर मंडपात निवांत हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर goodnews_movement नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही वेळातच व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, या व्यक्तीची पत्नी सहा महिन्यांपासून रुग्णालयात होती. जेव्हा ती परत आली तेव्हा पतीला तिला एकटं सोडण्याची इच्छा नाही. व्हिडिओ पाहून लोकांनी हे खरं प्रेम असल्याचं म्हटलं. तसंच एका व्यक्तीने लिहिलं की, हा व्हिडिओ पाहून त्याने आपल्या पत्नीला आय लव्ह यू मेसेज केला.

)







