नवी दिल्ली 09 नोव्हेंबर : देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर (Social Media) भरपूर सक्रीय राहतात. ते सतत आपल्या ट्विटर हँडलवरुन वेगवेगळे व्हिडिओ (Twitter Video) शेअर करत राहतात. हे व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना प्रेरणा देणारे असतात. नुकतंच त्यांनी आणखी एक व्हिडिओ (Inspirational Video) शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की प्रयत्न करणारे लोक कधीच हारत नाहीत.
VIDEO : जमिनीच्या तुकड्यावरुन दोन गटांमध्ये खुनी संघर्ष; महिलांनाही मारहाण
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video on Social Media) तुम्ही पाहू शकता की एका लहान मुलगा भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करतो. वरती चढत असताना तो थोडा घाबरतो कारण पाय ठेवण्यासाठी त्याला जागा मिळत नसते. यामुळे तो थोडा खाली येतो. मात्र वरती चढण्यासाठी ग्रिप मिळताच तो आनंदात वरती चढत जातो. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही काम करण्याची प्रेरणा मिळेल.
This video is from a couple of years ago, but I don’t think it will ever be ‘dated.’ I like to put it on every now & then, especially when some personal or business goal is looking intimidating or impossible! All my fears vanish instantly… pic.twitter.com/9XtuyBVxwJ
— anand mahindra (@anandmahindra) November 8, 2021
आनंद महिंद्रांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, हा व्हिडिओ जुना आहे, मात्र मला नाही वाटत की हा व्हिडिओ कधी जुना होईल. मला हा व्हिडिओ वारंवार पोस्ट करायला आवडतो. विशेषतः तेव्हा जेव्हा काही वैयक्तिक किंवा व्यवसायिक टार्गेटची भीती असते. हा व्हिडिओ माझी पूर्ण भीती संपवतो.
फ्राईड चिकनचा असा प्रकार पाहून डोकं गरगरेल, VIDEO पाहून नॉनवेज प्रेमीही हैराण
सोशल मीडियावरही लोकांची या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेक यूजर्सने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की या व्हिडिओनं मला प्रेरणा दिली. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की हा व्हिडिओ पाहून माझी बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.