मुंबई 2 सप्टेंबर : इंटरनेटच्या दुनियेत विवाहसोहळ्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ समोर येतातय हे व्हिडीओ कधी डान्सचे तर कधी लग्नातील घडलेल्या एखाद्या मजेदार गोष्टींचे असतात. लोकांना असे लग्नाचे व्हिडीओ पाहायला फार आवडतात. लोक मनसोक्तपणे अशा व्हिडीओचा आनंद घेतात आणि आपल्या मित्रांना देखील ते शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर एका डान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक महिला डान्स करत आहे. या महिलेनं आपल्या दीराच्या लग्नात असा काही गाण्याचा ठेका धरला की पाहून सगळेच थक्क झाले खरंतर लग्नात एन्ट्रीदरम्यान डान्स करण्याचा ट्रेंड सध्या खूपच व्हायरल होत आहे आणि असंच या महिलेनं केलं, या सुंदर महिलेनं आपल्या दिराच्या लग्नात त्याच्या एन्ट्रीला डान्स केला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नववधू आणि नवरदेव एन्ट्री घेत असतात. तेव्हा त्यांच्या पुढे एक महिला डान्स करत आहे. ही महिला नवरदेवाची वहिनी असल्याचे सांगण्यात येत आहे. हे वाचा : तरुणींसोबत काका डान्स करण्यात व्यस्तं, तेव्हाच काकूंनी पाहिलं आणि मग सुरु झाला फॅमेली ड्रामा, Video Viral बॉलिवूडमधील ‘‘लो चली में.. आपणी देवर की बारात लेके… लो चली में…’’ असं म्हणत या महिलेनं गाण्यावर ताल धरला आणि आपल्या दिराच्या एन्ट्रीला मनसोक्तपणे ती नाचली.
सुरुवातीला या वहिनीचा डान्स साधा वाटतो, परंतु त्यानंतर ती ज्यापद्धतीने या गाण्यावर नाचू लागते की, लग्नातील संपूर्ण मोहोलच बदलून गेला. हे वाचा : रिसेप्शनमध्येच गाढ झोपली नवरीबाई, मग नवरदेवाने…; वाचा एका लग्नाची ही भन्नाट गोष्ट हा व्हिडीओ क्वीन्स वेडिंग वर्ल्ड नावाच्या यूट्यूब अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे.