जाहिरात
मराठी बातम्या / Viral / रिसेप्शनमध्येच गाढ झोपली नवरीबाई, मग नवरदेवाने...; वाचा एका लग्नाची ही भन्नाट गोष्ट

रिसेप्शनमध्येच गाढ झोपली नवरीबाई, मग नवरदेवाने...; वाचा एका लग्नाची ही भन्नाट गोष्ट

स्वतःच्याच लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नवरी झोपली.

स्वतःच्याच लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नवरी झोपली.

सोशल मीडियावर एका युझरने वेडिंग रिसेप्शनचा अजब किस्सा सांगितला आहे. हा किस्सा वाचून सर्वजण हैराण झाले आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

लंडन, 01 सप्टेंबर : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. लग्नातील प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेण्याचा आणि तो क्षण अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न सर्वांचा असतो. त्यासाठी कित्येक दिवस लग्नाची तयारी सुरू असते. पण ऐन लग्नात किंवा लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये नवरा किंवा नवरदेव यांना झोप लागली तर काय होईल… अशाच एका लग्नाचा किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एक नवरीबाई चक्क आपल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये झोपली. रेडिट या सोशल मीडियावर एका युझरने लग्नाचा हा किस्सा सांगितला आहे. हा युझर एका लग्नाचा रिसेप्शनला गेला, तिथं नवरी दारू पिऊन आली आणि ती रिसेप्शनमध्येच झोपली. त्यानंतर काय काय घडलं ते त्याने सर्व आपल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. रेडिट पोस्टनुसार नवरीने रिसेप्शन पार्टी सुरू होण्याआधी दारू प्यायला सुरू केली. नवऱ्यासोबत ती संध्याकाळी 6 वाजता रिसेप्शन व्हेन्यूवर पोहोचली तेव्हा तिला नीट उभंही राहता येत नव्हतं. तिचा तोल ढासळत होता. तिथं पोहोचल्यानंतर मग घाईघाईत नवरा-नवरीने  केक कापला आणि जे काही कार्यक्रम होते ते पटापट आटोपले. नंतर पार्टी सुरू झाली. पण या पार्टीत नवरीबाई गायब होती. कारण नवरी रिसेप्शन व्हेन्यूवरच एका काऊचवर झोपली होती. हे वाचा -  VIDEO : मेरी शादी करवाओ! तरुणामागे पळत सुटली तरुणी; लग्नासाठी भररस्त्यात ड्रामा रात्री 8 वाजता झोपलेली नवरी रात्री 11 वाजता उठली. तोपर्यंत पार्टी संपत आली होती. त्यानंतर तिला लोक धरून कारपर्यंत घेऊन जात होते, तेव्हाच तिला उलट्या होऊ लागल्या. एका बादलीत तिने उलटी केली. वेडिंग गाऊन आणि नटूनथटून आलेल्या नवरीला असं उलटी करताना पाहून सर्वजण हैराण झाले. बिच्चा नवरदेव संपूर्ण पार्टीत एकटाच सर्वांशी गप्पा मारत होता. डान्स करण्यासाठी, पार्टी एन्जॉय करण्यासाठी त्याच्यासोबत कुणीच पार्टनर नव्हता. त्यामुळे त्याची आपल्याला दया वाटत होती, असं या युझरने म्हटलं आहे. हे वाचा -  एका पापडासाठी लग्नात भिडले वऱ्हाडी, सर्वात साक्षर राज्यातला धक्कादायक VIDEO ही पोस्ट पाहिल्यानंंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने नवरीला आता तिच्या रिसेप्शन पार्टीत आपला एकही फोटो दिसणार नाही याचा तिला पश्चाताप होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात